बेंगळुरूच्या व्यालीकवल परिसरात एका महिलेचा निर्घृण खून केलेला मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आल्याची घटना घडली. महालक्ष्मी (२९) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. तिच्या शरीराचे सुमारे २० ते ४० तुकडे करण्यात आले होते आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. ही हत्या १५ दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे.
२ सप्टेंबरपासून तिचा फोन बंद होता. पीडितेच्या शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि आजूबाजूच्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी शरीराचे अवयव घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकाचीही मदत घेतली आहे.
हेही वाचा..
कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, यावेळीही रुळावर ठेवले सिलेंडर!
सोने आणि हिऱ्यांच्या तस्करीत तिघांना अटक, ३.१२ कोटींचा माल जप्त!
कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विजयांची संख्या आता जास्त, बांगलादेशला नमविले
पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित कसा होऊ दिला जातो?
या वर्षाच्या सुरुवातीला पती हेमंत दास यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर महालक्ष्मी बेंगळुरूमध्ये एकटीच राहत होती. ती मूळची नेपाळची आहे. पीडितेला ४ वर्षांची मुलगी असून ती तिच्या पतीसोबत राहते. या प्रकरणाची माहिती मिळताच हेमंत दास हेही घटनास्थळी पोहोचले. ते दर पंधरवड्याला आपल्या मुलासह महालक्ष्मीच्या घरी येत होते.
या घटनेबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, महालक्ष्मीचा फोन २ सप्टेंबरपासून बंद होता. काळजीपोटी तिची आई आणि बहिण या दोघी घरी आल्या. जेव्हा आम्ही दार उघडले, तेव्हा आम्हाला रेफ्रिजरेटरच्या दारातून रक्त वाहून आल्याचे दिसले. तिचे पाय कापून रेफ्रिजरेटरच्या वर ठेवले होते, तर उर्वरित शरीराचे भाग मधल्या शेल्फवर ठेवले होते. डोके रेफ्रिजरेटरच्या तळाशी ठेवले होते, असे त्यांनी सांगितले.
हे प्रकरण श्रद्धा वालकर या २७ वर्षीय महिलेच्या तिच्या लिव्ह-इन-पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने केलेल्या हत्येची आठवण करून देणारे आहे. त्याने १८ मे २०२२ रोजी पीडितेचा गळा दाबून खून केला होता आणि त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते.