कुटुंबाला वाचवले पण स्वत:चा जीव गमावला

नवी दिल्लीतील रेल्वे स्थानक परिसरात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

कुटुंबाला वाचवले पण स्वत:चा जीव गमावला

नवी दिल्लीतील रेल्वे स्थानक परिसरात रविवारी सकाळी विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने स्वत:च्या कुटुंबाला वाचवले, मात्र स्वत:चा जीव तिला गमावावा लागला.

३५ वर्षीय साक्षी आहुजा कुटुंबासोबत प्रीत विहार परिसरात राहात होती. विजेच्या धक्क्याची जाणीव होताच तिने कुटुंबाला सावध केले. मात्र ती स्वत:चा जीव वाचवू शकली नाही. या घटनेनंतर साक्षीची बहीण माधवीला मानसिक धक्का बसला आहे. बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिलाही विजेचा धक्का बसल्याने ती जखमी झाली आहे. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे. साक्षीला पाय ठेवताच विजेचा धक्का जाणवला. तेव्हा तिने तातडीने लोकांना मागे राहण्यास सांगितले. मात्र ती स्वत:ला वाचवू शकली नाही आणि तिचा दुसरा पायही पाण्यात गेला.

साक्षी ही तिचे आई-वडील आणि बहिणीसोबत चंदीगडला जाणार होती. त्यासाठी त्यांनी २५ जूनचे वंदे भारत ट्रेनचे तिकीट काढले होते. त्यानुसार साक्षीने तिची दोन मुले, आई-वडील आणि बहिणीसोबत पहाडगंडच्या दिशेने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवेश केला. तिला सोडण्यासाठी तिचे दोन भाऊ गाड्यांमधून आले होते. ते गाड्या पार्क करण्यासाठी गेले होते. तर, वडील गाडीतच बसले होते. साक्षी तिची बहीण माधवी, आई आणि दोन मुलांसह फलाट क्रमांक एकच्या दिशेने चालत येत असताना रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे ती दुभाजकावरून चालत होती. प्रीपेड टॅक्सी बूथच्या जवळ पाणी कमी असल्याने तिथल्या जमिनीवर तिने पाय ठेवला. मत्र विजेच्या तारांशी संपर्क आल्याने पाण्यामध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. त्यामुळे साक्षीने तिथे पाय ठेवताच विजेचा धक्का लागून ती कोसळली.

हे ही वाचा:

शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची पालिकेच्या लुटीशी तुलना!

पाकिस्तानमध्ये पुन्हा अल्पसंख्याकांवर अत्याचार; दोन शीखांना घातल्या गोळ्या !

असुद्दिन ओवेसींच्या रॅलीत ‘औरंगजेब’ अवतरला

अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

साक्षी व्यवसायाने आर्किटेक्ट होती. तिचे पती इंजिनीअर असून या दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे. साक्षीच्या कुटुंबीयांनी या घटनेला रेल्वे प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे.

Exit mobile version