…आणि महिलेने काढले बकरीचेही रेल्वे तिकीट

तिकीट पाहून टीटीईच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले

…आणि महिलेने काढले बकरीचेही रेल्वे तिकीट

भारतात रुळांवरून धावणाऱ्या मेमू, पॅसेंजर, लोकल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवासी मोठमोठे सामान घेऊन चढतात. काहीजण तर त्याहीपुढे जाऊन आपल्या प्राण्यांनाही ट्रेनमधून सोबत घेऊन जातात. मात्र एका महिला प्रवाशाने तिच्यासोबतच्या बकरीचेही तिकीट काढून प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर ठेवले आहे.

 

भारतीय रेल्वेच्या एका रेल्वेतील जनरल डब्यात एक महिला उभ्या उभ्या प्रवास करत होती. बकरीला महिलेने स्वत:च्या हातांनी पकडून ठेवले होते. प्रवास तिकीट निरीक्षक (टीटीई) ने जनरल कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांसह उभ्या असणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटाचीही तपासणी सुरू केली. तेव्हा टीटीईचे लक्ष डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या एक महिलेकडे आणि तिच्या बकरीकडे गेले. टीटीईने बकरीला पकडून महिला प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली. त्यावर महिलेसोबत उभ्या असणाऱ्या व्यक्तीने तिकिट दाखवले. तेव्हा टीटीईने हसतच त्या महिलेला विचारले- बकरीचे तिकीट काढले नाही का? मात्र आश्चर्याची बाब अशी की, या महिला प्रवाशाने केवळ स्वत:चे नव्हे तर तिच्या बकरीचेही तिकीट काढले होते. या महिलेने तिच्यासोबतची व्यक्ती आणि बकरी अशा तिघांचे तिकीट काढले होते. त्यामुळे टीटीईच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले. टीटीई हसत आहेत पाहून या महिलेच्या चेहऱ्यावरही स्मित झळकले.

हे ही वाचा:

उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य हे नरसंहाराची हाक म्हटल्याबद्दल मालवीय यांच्यावर गुन्हा

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीला अटक

उदयनिधीनंतर डीएमकेच्या नेत्याने ओकली गरळ; सनातन धर्माची HIV बरोबर तुलना

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी

हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना नेमक्या कुठल्या ट्रेनमधली आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या महिलेचे नितळ हास्य पाहून तिने अनेकांची मने जिंकली आहेत. तिच्या या प्रामाणिकपणाचे सगळीकडून कौतुक होत आहे. अशी साधी-सरळ आणि निष्कलंक माणसेच भारताची मान गर्वाने उंचावत आहेत, अशी प्रतिक्रियाही काहींनी दिली आहे.

Exit mobile version