प्राणीप्रेमी, त्यांच्याकडे असलेले प्राणी आणि त्या प्राण्यांचे सुरू असलेले लाड यासंबंधीच्या वेगवेगळ्या कथा समोर येतच असतात. अशीच एक घडलेली अनोखी घटना नुकतीच मुंबई- चेन्नई विमानप्रवासादरम्यान समोर आली आहे. एका प्राणीप्रेमी महिलेने आपल्या जवळील प्राण्याला प्रवासात त्रास नको, गर्दी नको म्हणून विमानाचा अख्खा बिझनेस क्लास बुक केला होता.
नुकताच एका महिलेने १५ सप्टेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अख्खा बिझनेस क्लास तिच्याकडील पाळीव श्वानासाठी बुक केला. महिला तिच्या ‘माल्टेस’ जातीच्या कुत्र्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर ही महिला तिच्या गोंडस कुत्र्यासोबत चेन्नईला जाणाऱ्या विमानात चढली. वैमानिकाची परवानगी असल्यास श्वानाला विमानातून प्रवास करता येतो. त्यामुळे श्वानाच्या प्रवासाचे कोणाला नवल वाटले नाही.
हे ही वाचा:
‘वॅक्सीन मैत्री’ लवकरच पुन्हा सुरु
अफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता दूर होणार
संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये
मात्र, त्याच्या प्रवासातले वेगळेपण सहप्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांच्या नंतर लक्षात आले. एअर इंडियाच्या या विमानातील ‘इकोनॉमी’ श्रेणीतील सर्व आसने भरलेली होती. कागदोपत्री ‘बिझनेस’ श्रेणीही भरलेली दिसत होती. मात्र या विभागात कोणीही प्रवासी नव्हते. ही श्रेणी संपूर्ण श्वानांसाठी बुक करण्यात आली होती. अशा प्रकारे दोन तासांचा आलिशान प्रवास करत हा कुत्रा आपल्या मालकिणीसोबत चेन्नईला पोहचला.
एअर इंडियाच्या एअरबस जातीच्या विमानात बिझनेस श्रेणीत १२ आसने असतात. प्रत्येक आसनाचे मुंबई- चेन्नई प्रवासाचे भाडे २० हजार रुपये आहे. त्यानुसार या महिलेने तब्बल अडीच लाख या हवाई प्रवासासाठी मोजले. लाडक्या श्वानासाठी संपूर्ण बिझनेस श्रेणी बुक करण्याची ही पहिलीच वेळ होती असे सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.