‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून सागरी प्राण्याला मिळाली नवी ओळख!

तमिळनाडूच्या संशोधकांनी घेतला निर्णय

‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून सागरी प्राण्याला मिळाली नवी ओळख!

‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेने भारताचे नाव देशात रोशन झाले.चंद्रयान-३ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत भारताने नवा इतिहास रचला होता.दरम्यान, ‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून टार्डिग्रेड नावाच्या सूक्ष्मजीवाच्या नव्या प्रजातीला नवीन नाव देण्यात आलं आहे.

तमिळनाडूतील एका विद्यापीठाने सागरी टार्डिग्रेड या सूक्ष्मजीवाच्या नव्या प्रजातीला ओळख दिली आहे.टार्डिग्रेड सूक्ष्मजीवाच्या नव्या प्रजातीला ‘बॅटिलिप्स चंद्रयानी’ असे नाव विद्यापीठाने दिले आहे.’चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेनंतर संशोधकांनी हा निर्णय घेतला आहे.द हिंदूच्या अहवालानुसार, तमिळनाडूच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्याजवळ सागरी सूक्ष्मजीव टार्डिग्रेडची एक नवी प्रजाती आढळून आली.कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजी(CUSAT) च्या संशोधकांनी सागरी सूक्ष्मजीव टार्डिग्रेडचे नाव ‘चांद्रयान-३’ वर ठेवले आहे.

हे ही वाचा:

गडचिरोली पोलिसांकडून कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी, ३ क्लेमोर स्फोटके नष्ट

‘टी -२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट’

पीओके भारतात सामील होण्याबाबत केलेल्या विधानावर अब्दुल्ला म्हणतात, पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत

बॉल म्हणून उचलला बॉम्ब आणि…

दरम्यान, टार्डिग्रेड नावाचे सूक्ष्मजीव पृथ्वीवरच्या कोणत्याही वातावरणात सापडतात. यांचा शोध अडीचशे वर्षांपूर्वी, १७७३मध्ये लागला. लहानशा सूक्ष्म दर्शकामधूनही यांचे निरीक्षण करता येते. टार्डिग्रेडच्या आतापर्यंत बाराशेपेक्षा जास्त प्रजाती सापडल्या आहेत. पाण्यात, शेवाळावर सापडणारे असे अनेक प्रकारचे टार्डिग्रेड आहेत. टार्डिग्रेडला ‘समुद्री अस्वल’ (वॉटर बेअर) या नावानेही ओळखले जाते. आठ पायांचे हे प्राणी त्यांच्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शरीरामुळे ‘टार्डिग्रेडा’ या जातीमध्ये गणले जातात.

Exit mobile version