पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच ऑस्ट्रिया दौरा पार पडला. ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी व्हिएन्ना येथे एका सामूहिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले. ‘भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. व्हिएन्ना येथे झालेल्या या सामुदायिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचताच लोकांनी ‘मोदी, मोदी’च्या घोषणा दिल्या.
भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताबाबत आज संपूर्ण जगात चर्चा होत आहे. भारताबाबत जाणून आणि समजून घेण्याची सर्वांना इच्छा आहे. हजारो वर्षांपासून भारताने जगभराला ज्ञान आणि कौशल्य दिले आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही युद्ध दिले नाही, छाती उंच करून जगाला सांगू शकतो की, ‘भारताने जगाला युद्ध नाहीतर बुद्ध दिला आहे’. भारताला ‘विश्वबंधू’ म्हणून जग ओळखत आहे आणि हे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे.
हे ही वाचा:
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रार
अनेक महिने बर्फात दबलेले तीन जवानांचे मृतदेह लष्कराला सापडले !
शासकीय नोकरी मिळताच पत्नीने पतीला दिला डच्चू !
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
ते पुढे म्हणाले की, माझी ऑस्ट्रियाची ही पहिलीच भेट असून इथला उत्साह पाहून मी सुद्धा अद्भुत झालो आहे. ही प्रतीक्षा एका ऐतिहासिक प्रसंगी संपली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया त्यांच्या मैत्रीची ७५ वर्षे साजरी करत आहेत. दरम्यान, भारताच्या पंतप्रधानांनी तब्बल ४१ वर्षानंतर ऑस्ट्रियाला भेट दिली आहे. ऑस्ट्रियामध्ये पंतप्रधान मोदींनी भारतात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचाही उल्लेख केला .