21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषकर्नाटकचा अजब कारभार; ३१ वर्षांनी कारसेवकाला अटक!

कर्नाटकचा अजब कारभार; ३१ वर्षांनी कारसेवकाला अटक!

राम मंदिर सरकारच्या डोळ्यात खुपसत असल्याने ३१ वर्षानंतर रामभक्ताला जाणूनबुजून अटक, भाजप

Google News Follow

Related

एकीकडे अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचा अभिषेक होणार आहे, तर दुसरीकडे कर्नाटकात राम मंदिराच्या मुद्द्यावरून ३१ वर्षे जुन्या प्रकरणावरून गदारोळ सुरू झाला आहे. राम मंदिर आंदोलनाशी संबंधित असलेल्या एका कारसेवकाला ३१ वर्षे जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.या कारवाईनंतर भाजपने कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.काँग्रेस सरकार जाणूनबुजून कारसेवकांना त्रास देत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे या अटकेविरोधात भाजप उद्या म्हणजेच ३ जानेवारीला बेंगळुरूमध्ये आंदोलन करणार आहे.

१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर कर्नाटकातील हुबळी येथे निदर्शने झाली होती. या हिंसाचारात ५० वर्षीय कारसेवक श्रीकांत पुजारी यांनाही आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणातच पुजारीला तब्बल ३१ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. या अटकेचा तीव्र निषेध व्यक्त करत भाजपने पुजाऱ्यावरील कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. कारण राम मंदिर काँग्रेसच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळेच ३१ वर्षांनंतर जाणूनबुजून रामभक्ताला अटक करत आहेत.याच्या निषेधार्थ भाजपतर्फे ३ जानेवारीला कर्नाटकात निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

जपानच्या भूकंपाने जागवल्या २००४च्या महाप्रलयाच्या आठवणी!

‘एका न्यायाधीशाचे श्रेय नाही, अयोध्या खटल्याचा निर्णय हा सर्वसंमत’

महाराष्ट्र पोलीस दलाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी

भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

कर्नाटक भाजपचे प्रमुख बीवाय विजयेंद्र यांनी म्हटले आहे की, काँग्रेस सरकारने एका हिंदू कार्यकर्त्याला ३० वर्षे जुन्या प्रकरणात अटक केली आहे.श्रीकांत पुजारीची तात्काळ सुटका करावी.लोक राम मंदिरासाठी प्रार्थना करत आहेत आणि हे सरकार एका हिंदू भक्ताला अटक करत आहे, हे दुःखद आहे,असे विजयेंद्र म्हणाले.

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी पत्रकारांना सांगितले की, ३१ वर्षांच्या अयोध्या आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदू कार्यकर्त्यांवर पुन्हा खटले सुरू करून काँग्रेस हिंदू कार्यकर्त्यांना धमकावत आहे.

यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, जर कोणी चूक केली असेल तर आम्ही त्याला काय करणार? ज्याने गुन्हा केला त्याला मोकळे सोडायचे का? आमचे सरकार सर्व जुने खटले संपवेल. पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली आहे. हे द्वेषाचे राजकारण नाही. आम्ही एकाही निरपराध व्यक्तीला अटक केली नाही, असे कनार्टक मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

दरम्यान, ही सर्व प्रकरणे १९९२ ते १९९६ दरम्यान राम मंदिर आंदोलनादरम्यान घडली. ५ डिसेंबर १९९२ रोजी हुबळी येथे अल्पसंख्याकांचे दुकान जाळल्याप्रकरणी पोलिसांनी श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीसह दोघांना अटक केली आहे. पुजारी हा या प्रकरणातील तिसरा आरोपी असून त्याला पोलिसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता पोलीस याच प्रकरणातील अन्य आठ आरोपींचा शोध घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा