हातमाग दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘या’ ट्विटला दिली पसंती

हातमाग दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘या’ ट्विटला दिली पसंती

आज राष्ट्रीय हातमाग दिवस. अनेक लोकांसाठी रोजगाराची आणि स्वाभिमानाची संधी उपलब्ध करू देणाऱ्या आणि स्वदेशी ओळख असलेल्या हातमागाच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त विविध नेत्यांनी ट्वीट करत हातमागाचा सन्मान राखण्याची भावना व्यक्त केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून देणारी आणि वेटलिफ्टिंगचे पहिले रौप्य पदक पटकाविणारी मीराबाई चानू ही समस्त भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहे. तिने केलेल्या एका ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट करत तिचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्त अनेक ट्वीट केले आहेत. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून राष्ट्रीय हातमाग दिवसाबद्दलचा अभिमान देखील व्यक्त केला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू हिने देखील हातमाग दिवसाबद्दल ट्वीट केले आहे. ते ट्वीट मोदींनी रिट्वीट करत मीराबाई चानूने हातमाग दिनाला दाखवलेल्या समर्थनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याबरोबरच एका ट्वीटमध्ये त्यांनी या हातमाग दिवसाचे महत्त्व देखील विशद केले आहे.

हे ही वाचा:

लाल चौकाची तिरंगी सजावट

…म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा

भारताच्या लस उत्पादनात वाढ

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या निमित्त ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीट करताना विणकर समाजाप्रती आदर देखील व्यक्त केला आहे. त्याबरोबरच या कामाशी निगडित असलेल्या समाजांना देखील शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील या दिवसाच्या निमित्ताने ट्वीट केले आहे. त्यांनी स्वतःच विणकाम करतानाचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये विणकर हातमागावरील विणकामाने भारताची जगात ओळख निर्माण करत आहेत असे देखील म्हटले आहे.

हातमाग हा ग्रामीण क्षेत्रातील रोजगारासाठी महत्त्वाचा भाग आहे. अनेक महिलांसाठी उपजिविकेचा हा महत्त्वाचा स्रोत आहे. ७ ऑगस्ट १९०५ रोजी चालू झालेल्या स्वदेशी चळवळीचे प्रतिक म्हणून आजचा दिवस हा हातमाग दिन म्हणून २०१५ पासून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे ७ ऑगस्ट २०१५ रोजी पहिल्या हातमाग दिनाचे उद्घाटन केले होते.

Exit mobile version