अमृता फडणवीस यांना म्हणून नको आहे ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन

'ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन' नाकारले

अमृता फडणवीस यांना म्हणून नको आहे ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन

मला सामान्य नागरिकासारखं जगण्याची इच्छा आहे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांना देऊ केलेली सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे. सुरक्षिततेचा एक भाग म्हणून देण्यात आलेले ‘ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन’ मागे घेण्याची विनंती अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.

गृह विभागाला राज्य गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालानंतर अलीकडेच अमृता फडणवीस यांना वाय दर्जाच्या सुरक्षितेसह ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन वाटप केले मला मुंबईच्या सामान्य नागरिकासारखे जगायचे आहे. मी मुंबई पोलिसांना नम्रपणे विनंती करते की, मला ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट व्हेइकल देऊ नका मुंबईतील वाहतुकीची स्थिती निराशाजनक आहे. परंतु मला खात्री आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत आणि विकास प्रकल्पांमुळे आम्हाला लवकरच दिलासा मिळेल,” असे अमृता फडणवीस यांनी बुधवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांना विशेष वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. या निर्णयातील विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी नवीन स्कॉट व्हेईकल (ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल) देखील मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आतापर्यंत एक्स प्लस सुरक्षा होती त्यात आता सुधारणा करून ती वाय प्लस करण्यात आली आहे.

अमृता यांच्या बाजूने ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची मागणी नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, या निर्णयानंतर अमृता फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांना सांगितले होते की, त्यांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची गरज नाही, मात्र त्यांच्या सुरक्षेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version