देशात लवकरच संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात माहिती दिली. यानुसार, २५ नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि २० डिसेंबरपर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे.
सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये किरेन रिजिजू म्हणाले की, “राष्ट्रपतींनी, भारत सरकारच्या शिफारशीनुसार, २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे हिवाळी अधिवेशन, २०२४ साठी बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.” २६ नोव्हेंबर, संविधान दिन; संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरा करण्यात येणार असल्याचेही किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :
२०३६ चे ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स भारतात होणार?
शरद पवार घेणार राजकीय निवृत्ती?
सलमान खानला धमकी देऊन पाच कोटींची मागणी करणाऱ्याला कर्नाटकातून अटक
‘संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक’
हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकार वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करेल जे सध्या सभागृहाच्या जेपीसीकडे आहे. अधिवेशनादरम्यान, सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आणण्याचा विचार करू शकते. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, त्यांचे सरकार ‘वन नेशन वन इलेक्शन’ हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे ज्यामुळे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. काँग्रेसने ‘वन नेशन वन इलेक्शन’ लागू करण्याची कल्पना नाकारली असून या विधेयाकाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.