कसोटी क्रिकेट हाच क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार आहे त्यामुळे आयसीसी कसोटी क्रिकेट अजिंक्यपद जिंकण्याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो, असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हल, इंग्लंड येथे हा कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. ७ ते ११ जून अशी ही लढत होत आहे.
या सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, आयसीसी अजिंक्यपदे जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रोत्साहित करणे हे माझे उद्दिष्ट आहे.
भारताने याआधी २०१३ मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. त्यामुळेच रोहित म्हणतो की, कसोटी क्रिकेट हे अधिक आव्हानात्मक आहे आणि म्हणून मी माझ्या संघाने आगामी काळात १-२ आयसीसी अजिंक्यपदे जिंकावीत यासाठी प्रयत्न करणार आहे.
भारताने नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
या सामन्यासाठी संघ कसा असेल हे विचारल्यावर रोहित म्हणाला की, १५ खेळाडूंच्या संपूर्ण संघाला सज्ज राहण्यासाठी सांगितले आहे, कारण इंग्लंडमधील वातावरण सातत्याने बदलणारे असते.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, आम्ही वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडला संघात स्थान दिले आहे. तर रोहित शर्माने सामन्याच्या दिवशी संघ जाहीर केला जाईल असे सांगितले. इथे खेळपट्टी, वातावरण सातत्याने बदलत असल्यामुळे आम्ही संघ नंतरच जाहीर करू.
हे ही वाचा:
नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले
‘काँग्रेसने द्वेषाचा शॉपिंग मॉल उघडला आहे’
परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र अव्वल!
मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
रोहितने सांगितले की, ही स्पर्धा कठीण होती. गेली दोन वर्षे आम्ही सातत्यपूर्ण खेळ केला. आता प्रत्येक विभागाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.