झायडसकडून पहिली डीएनए लस उपलब्ध होणार?

झायडसकडून पहिली डीएनए लस उपलब्ध होणार?

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत बोलताना कोविड-१९ ची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याच्या आरोपाचे खंडन केले. त्याबरोबरच त्यांनी भारतीयांचे वेगाने लसीकरण करण्यासाठी अधिकाधीक लसींचे उत्पादन करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे देखील कळवले आहे.

भारत सरकारने आरोग्य सुविधांच्या मजबुतीकरणासाठी २३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले होते, त्यावर देखील त्यांनी जोर दिला. त्यासोबतच झायडस कॅडिला या कंपनीतर्फे तयार करण्यात येणाऱ्या डीएनए लसीची देखील माहिती दिली. आपले शास्त्रज्ञ डीएनए लसीचे उत्पादन करत आहेत ही अभिमानास्पद बाब असल्याचे देखील ते म्हणाले.

हे ही वाचा:

२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…

प्राथमिक शाळा सुरु कराव्यात

इराकमध्ये आयएसआयएस डोकं वर काढतंय?

काय होता राज कुंद्राचा पॉर्न ‘प्लॅन बी’?

झायडस कॅडिला या अहमदाबाद येथील कंपनीने डीसीजीआयकडे नव्या लसीच्या मान्यतेसाठी मागणी केली आहे. झायडस कॅडिलाने तीन मात्रांच्या लसीवर संशोधन सुरू केले आहे. ZyCoV-D ही झायडसची लस भारतात निर्माण झालेली दुसरी लस असेल. या लसीला मान्यता मिळाल्यानंतर ही भारतातील पाचवी लस असेल आणि डीएनए प्रकारची जगातील पहिली लस असेल.

या लसीची चाचणी १२ ते १८ वयोगटातील बालकांवर केली जात आहे. ही कंपनी या लसीच्या सुई विरहीत १२० मिलीयन मात्रांचे उत्पादन करणार आहे. सध्या या लसीची चाचणी चालू आहे.

झायडसने लसीची परिणामकारकता ६६.६ टक्के असेल असा दावा केला आहे. क्लिनिकल ट्रायल्सच्या शेवटच्या टप्प्यात २८,००० लोकांवर या  लसीची चाचणी घेण्यात आली होती. त्यावर आधारित हा निष्कर्ष काढण्यात आला होता.

Exit mobile version