बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणार का?

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये 'न्याय यात्रा'

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणार का?

बांगलादेशात हिंदूवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. कट्टरपंथीयांकडून हिंदुना लक्ष्य केले जात आहे, सरकार देखील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यावरून देशासह अन्य देशांनी सुद्धा चिंता व्यक्त करत सरकारला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. भारतासह राज्यात हिंदूवरील अत्याचारा विरोधात निदर्शने, आंदोलन, रॅली काढण्यात आल्या आहेत, येत आहेत. मुंबईतील घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदरमध्येही काल (८ डिसेंबर) रॅली काढण्यात आली. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्या ‘न्याय यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.

बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याच्राराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये उद्या (१० डिसेंबर) न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. संकल हिंदू समाजाकडून न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहे. हिंदू म्हणून एक व्हा…जय श्री राम…जय शिवराय, बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारांवर आपण भारतीय हिंदू म्हणून रस्त्यावर दिसाल का?, अशा मजकुराचे पोस्टर जागोजागी, रिक्षावर लावण्यात आले आहेत. सकल हिंदू समाजाकडून लोकांना न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या सकाळी १० वाजता या न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे. बी.डी. भालेकर मैदान, शालीमार, नाशिक या ठिकाणी एकजूट होण्यास सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

लोकसभेतं मविआला ईव्हीएम गारगार वाटलं आणि आता गरम वाटतंय!

मोदीजी, बॉर्डरचे गेट उघडा, १५ मिनिटांत बांगलादेश स्वच्छ करू!

कर नाही, त्याला नाही डर… उसका नाम राहुल नार्वेकर; विधानसभेत शिंदेंची शेरोशायरी

‘अमृत’च्या सल्लागार पदी विश्वजीत देशपांडे यांची नियुक्ती

हे ही वाचा : 

लोकसभेतं मविआला ईव्हीएम गारगार वाटलं आणि आता गरम वाटतंय!

कर नाही, त्याला नाही डर… उसका नाम राहुल नार्वेकर; विधानसभेत शिंदेंची शेरोशायरी

मोदीजी, बॉर्डरचे गेट उघडा, १५ मिनिटांत बांगलादेश स्वच्छ करू!

न्यायप्रिय, संयमी व्यक्तिमत्व विधानसभेच्या अध्यक्षपदी लाभल्याचा आनंद

 

Exit mobile version