ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!

इस्रायली कुटुंबाला मस्क यांनी केले आश्वस्त

ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क सध्या इस्रायल दौऱ्यावर आहेत.इस्रायल दौऱ्यादरम्यान एलोन मस्क यांना एका ओलिसांच्या वडिलांनी भेट म्हणून ‘डॉग टॅग’ (लष्करातील अधिकारी तसेच कुत्र्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या गळ्यात या पद्धतीचे लॉकेट असते.) दिला , ज्यामध्ये ”आमची ह्रदये गाझामध्ये ओलिस आहेत” असा मजकूर कोरलेला आहे.एलोन मस्क यांनी ही भेट स्वीकारली आणि म्हणाले, “तुमच्या प्रियजनांना सोडले जात नाही तो पर्यंत मी हा ‘डॉग टॅग दररोज गळ्यात घालेन.

चार दिवसांच्या युद्धविराम करारानंतर इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यातील लढाई थांबली आहे. करारानुसार, हमासने ६९ ओलिसांची सुटका केली तर इस्रायलने सुमारे १५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. युद्धविराम आणखी दोन दिवस वाढवण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी ओलीसांची देवाणघेवाण करणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

‘मुंबई आता जुनी झाली, बॉलीवूड हैदराबादला जाणार!’

ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अटक

एलोन मस्क यांनी इस्रायली राष्ट्राध्यक्ष इसाझ हर्झोग आणि ओलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली.या भेटीदरम्यान, राहेल नावाच्या पालकाने एलोन मस्क यांना एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये हमासने त्याच्या मुलाचे अपहरण केले होते.त्यांनतर आणखी एका पालकाने, मस्क यांना भेट म्हणून ‘डॉग टॅग’ दिला, त्यावर ‘आमची ह्रदये गाझामध्ये ओलिस आहेत” असे लिहिले होते.मस्क त्यांची भेट स्वीकारत म्हणाले, जो पर्यंत तुमच्या प्रियजनांची सुटका होत नाही तो पर्यंत हा ‘डॉग टॅग’ मी गळ्यात घालून ठेवेन.अध्यक्ष हरझोग यांच्या कार्यालयाने या बैठकीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

 

 

Exit mobile version