28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषमुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार

सामानधारक पावसाने यंदा मुंबईची तहान भागणार...

Google News Follow

Related

राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे जवळ-जवळ सर्वच जलाशयामध्ये पाण्याची पातळी सामानधारक आहे. या वर्षी जुलै- ऑगस्ट मध्ये पहिल्याच टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील धरणामध्ये गेल्या चार- पाच वर्षातील सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईतला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, तानसा, सागर, मोडक, तुळसी, विहार, भातसा या सातही जालाशयामध्ये सध्या ९७.०३ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

पावसाने यंदा जोरदार हजेरी लावल्याने चार ते पाच वर्षापेक्षा पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे, राज्यासह मुंबईतील सर्वच जलाशये संपूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. सध्या राज्यात सरासरी पावसापेक्षा यंदा २० टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या काळात बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

राज्यातील १४१ मोठे प्रकल्प, २५८ मध्यम प्रकल्प आणि इतर लघु प्रकल्प मिळूनही यंदाचा पाणीसाठा अधिक आहे. सर्व प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ८३ टक्क्यांच्या पुढे आहे. २०२१ आणि २०२० च्या तुलनेत तो २० टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागात सध्या सर्वाधिक ९० टक्के, तर पुणे विभागात ८८ टक्क्यांहून अधिक पाणी साठले आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, यंदा राज्यातील मोठय़ा धरणांमधील एकूण पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. २०२१ मध्ये याच कालावधीत हा पाणीसाठा ७३ टक्क्यांच्या आसपास होता. २०२० मध्ये तो ७५ टक्के होता. त्यापूर्वीच्या दोन-तीन वर्षांच्या काळातही ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता.

हे ही वाचा:

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

एकनाथ शिंदे यांच्यामुळे मेट्रो धावणार आहे

चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप

वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. यामध्ये मुंबईची प्रमुख सातही धरणांची पाणी साठवणूक क्षमता साडे चौदा दशलक्ष लिटर इतकी आहे. राज्यात पावसाचे चार महिने संपले की, पाणीसाठ्याचा अंदाज घेतला जातो. यामध्ये ऑगस्ट मधेच पाण्याची पातळी ९७ टक्के इतकी झाल्याने पाणीचिंता दूर झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा