विराट कोहली आरसीबीचे कर्णधारपद सोडणार?

विराट कोहली आरसीबीचे कर्णधारपद सोडणार?

‘कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८- ९ वर्षांपासून तीनही क्रिकेट प्रकारातील भार वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून वन- डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. टी- २०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि फलंदाज म्हणून देत राहीन,’ असे मत व्यक्त करत विराट कोहलीने आगामी वर्ल्डकप स्पर्धेनंतर टी- २० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे त्याने म्हटले आहे. यानंतर विराट आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदातून मुक्त होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

आयपीएल मध्ये २०१३ पासून विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. मात्र अद्याप एकदाही आयपीएलचा चषक त्याला उंचावता आलेला नाही. त्यामुळे वर्कलोड सांगून त्याने टीम इंडियाचे नेतृत्व सोडले, तसेच तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे कर्णधारपद सोडेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हे ही वाचा:

जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला

विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!

‘लस ऑलिम्पिक’ असते तर भारताने सुवर्ण पदक पटकावले असते.

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

विराट कोहलीने कामाच्या ताणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. कोणत्या प्रकारचा ताण त्याच्यावर आहे, असे बीसीसीआयच्या एका माजी पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. डिसेंबर २०२० नंतर आंतरराष्ट्रीय टी- २० पेक्षा आयपीएलचेच सामने अधिक खेळवले गेले आहेत. आयपीएलमधील कर्णधारपद अधिक आव्हानात्मक असते, फ्रॅंचाइजकडून प्रत्येक सामना जिंकण्याचा आग्रह ताण देणारा असतो. मग अशा परिस्थितीत विराट बंगळूरू संघाच्या कर्णधारपदातून मुक्त होणार आहे का, कसोटी, एक दिवसीय, टी- २० आणि आयपीएल अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करणे सोपे नसल्याचे माजी पदाधिकाऱ्याने सांगितले.

आयपीलचा दुसरा टप्पा रविवार (१९ सप्टेंबर) पासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सात पैकी पाच सामने जिंकून गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले आहे. यंदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी आहे. २०२२च्या आयपीएलमध्ये १० संघ खेळणार असून नव्याने लिलाव होणार आहे.

Exit mobile version