राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अडवाणी, मुरली मनोहर जोशींना रितसर निमंत्रण

 लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे आश्वासन, विहिंप नेत्यांची माहिती

 राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अडवाणी, मुरली मनोहर जोशींना रितसर निमंत्रण

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोघांनाही २२ जानेवारी रोजी अयोध्यातील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा समारंभास उपस्थित राहण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी अडवाणी आणि जोशी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. या समारंभास हे दोन्ही नेते उपस्थित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी अलोक कुमार यांना सांगितल्याची माहिती विहिंप नेत्यांनी दिली.

हेही वाचा..

बिहार; जनता दल (युनायटेड) पक्षाच्या नेत्यावर अज्ञातांनी झाडल्या गोळ्या!

हैदराबाद; पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, दोन ड्रग्ज तस्करांपासून ३.५ किलो अफू जप्त!

संसद आवारात राज्यसभा सभापतींची केली नक्कल

लोकसभा अध्यक्षांकडून ४९ खासदारांचे निलंबन

जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे वय अनुक्रमे ९६ आणि ८९ असल्यामुळे त्यांनी या समारंभास उपस्थित राहण्यास नम्रपणे नकार दिल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे.  राम मंदिराच्या अभिषेक समारंभासाठी आमंत्रित केलेल्या मान्यवर व्यक्तींमध्ये अभिनेता अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांचा समावेश आहे. यांनी ‘रामायण’ मालिकेत भगवान राम आणि देवी सीतेची भूमिका केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. विराट कोहली, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह इतर कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

याशिवाय ३ हजार व्हीआयपींचा समावेश असलेल्या सुमारे ७ हजार पेक्षा पाहुण्यांना राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रणे मिळाली आहेत. मंदिर आमंत्रणात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आमंत्रण देण्यात येणार आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहनराव भागवत, योगगुरू स्वामी रामदेव महाराज यांच्यासह देशभरातील लेखक, पत्रकार, वैज्ञानिक अशा प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रणे देण्यात आली आहेत.

 

Exit mobile version