मुंबईत पुन्हा धावणार ट्राम?

मुंबईत पुन्हा धावणार ट्राम?

मुंबईच्या अनेक उद्योगधंद्यांचे केंद्र असलेल्या बीकेसीमध्ये विविध प्रकारच्या प्रवासी वाहतूक साधनांचा वापर करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) प्रयत्न आहे. यात लोहमार्गवरून होणाऱ्या आणि रस्त्यावरून केल्या जाणाऱ्या प्रवासी वाहतूकीचा समावेश आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार झाले तर बीकेसीमध्ये शहरात प्रथमच केवळ ट्रामसेवाच नाही तर विजेवर चालणाऱ्या स्मार्ट बसेसची सेवा देखील सुरू होऊ शकेल. या यंत्रणेत मेट्रो आणि ट्राम या दोन्हीची वैशिष्ट्ये असतात, आणि त्याला लाईट रेल ट्रान्जिट (एलटीआर) या नावाने ओळखले जाते. एलटीआर चालू झाल्यानंतर कित्येक दशकांनी १९६४ मध्ये हद्दपार करण्यात आलेली मुंबईकरांची ला़डकी ट्राम शहरात पुन्हा एकदा चालू होऊ शकेल.

मुंबईतील जुनी ट्राम- फोटो इंटरनेटवरून साभार

एमएमआरडीए उर्जाप्रेमी वाहतूकीच्या पद्धतींच्या शोधात आहे. यापूर्वी थोड्या काळासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र बस मार्गिकेचा प्रयोग बीकेसीमध्ये राबवला होता. याशिवाय सध्या मेट्रोच्या कामांमुळे अरूंद केलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक आरक्षित मार्गिकेतून देखील चालू करावी लागली आहे. 

एमएमआरडीएच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरण याबाबत सखोल अभ्यास करणार आहे. बीकेसी आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील जमिन वापराची पद्धती, भूगोल इत्यादी बाबींचा विचार केला जाईल. त्याबरोबरच जगात प्रवासी वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पर्यायांचा विचार करेल. मोठ्या प्रमाणात सर्वे करून, डेटा गोळा करून त्या आधारे निष्कर्षाप्रत येईल. त्यानंतर प्रकल्पाची आखणी करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूदीची मागणी केली जाईल.

या प्रकल्पासाठी सर्वात जास्त विचार केल्या जाणारी स्मार्ट बस विजेच्या सहाय्याने आभासी मार्गिकांवर धावते. त्यामुळे बस तिच्या मार्गिकेपासून ढळणार नाही. त्यासोबतच एलआरटीचा देखील विचार केला जात आहे. एलआरटी छोट्या वळणांवर, चढावावर उपयुक्त आहे आणि ओव्हरहेड वायरच्या सहाय्याने त्यांना उर्जा पुरवली जाते. याशिवाय अद्ययावत अशा पॉडकारचा सुद्धा यात समावेश आहे. पॉडकार टॅक्सी प्रमाणेच असतात, मात्र त्यांची स्वतंत्र मार्गिका असते. 

वाहतूक विशेषज्ञ ए व्ही शेणॉय यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, एमएमआरडीए वाहतूकीच्या विविध पर्यायांचा विचार करत आहे, हे फार चांगले आहे. मात्र आधुनिक व्यवस्थांसोबत एमएमआरडीएने स्वस्त पर्याय जसे की एलिव्हेटेड सायकल मार्गिका, पादचारी मार्ग यांचा देखील विचार करावा. मुंबईच्या रस्त्यांवरील जागा हा भविष्यातील मोठा प्रश्न असणार आहे. प्राधिकरणाने नागरिकांकडून सुचना देखील मागवून घ्याव्यात, त्यातून नागरिकांना आवश्यक असलेल्या बाबींची त्यांना माहिती होईल. 

प्रवासी देखील याबाबत फार उत्सुक आहेत. दररोज प्रवास करणाऱ्या हरिश कामत यांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार मेट्रोचे जाळे कार्यान्वित झाल्यानंतर लास्ट माईल कनेक्टिविटीचा विकास करणे आवश्यक ठरणार आहे.

Exit mobile version