लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून उर्वरित सातव्या टप्प्यासाठी १ जून मतदान होणार आहे.यानंतर लोकसभा निवडणूक पार पडतील आणि सर्वांनाच उत्सुकता असेल ती ४ जूनच्या निकालाची.मात्र, पुन्हा राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, प्रचार सुरु होणार आहेत.कारण राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपणार असून दोन्ही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूका एकत्रित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.तसेच हरियाणा आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक एकत्र होण्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहेत तर हरियाणा राज्याच्या विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपणार आहे.नियम असा आहे की, विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी अथवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
रेमल चक्रीवादळाचा बंगालला तडाखा, एक मृत्यू, २ लाख लोक स्थलांतरित!
‘आईच्या मृत्यूनंतर मी अधिक धार्मिक झाले’
खोटे वृत्त पकडल्यानंतर ‘द वायर’ने त्यांच्या मतटक्क्यांचे वृत्त बदलले!
खासदार हत्येमागील सूत्रधार अमेरिकेत पळून गेल्याची शक्यता!
त्यामुळे विधानसभेची निवडणूक दिवाळी पूर्वीच लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा २००९ पासून एकाच वेळी होते.हरियाणाच्या विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर संपणार असल्याने हरियाणासोबत महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक पार पडू शकते.तसेच राजकीय नेत्यांकडून सुद्धा तशी तयारी करण्यात येत आहे.ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभा लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे लोकसभेचा निकाल ४ जूनला लागणार आहे.तत्पूर्वी राजकीय नेत्यांनी आतापासूनच विधानसभेचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी तयारी सुरु केली आहे.यावेळेची निवडणूक पाहण्यासारखी असणार आहे.कारण शिवसेना पक्षात दोन गट तसेच राष्ट्रवादीमध्ये दोन पडले आहेत.त्यामुळे महाराष्ट्राची जनता कोणत्या पक्षाला कौल देईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.