25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषभारत-इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द होणार?

भारत-इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द होणार?

Google News Follow

Related

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना शुक्रवारी (१० सप्टेंबर) रोजी सुरु होणार आहे. पण  या सामन्या पूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाला मोठा झटका बसला असून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बोलिंग कोच भरत अरुण आणि फिलडिंग कोच आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खेळाडूंटे बायो-बबलचे नियम आणकी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

या सर्वामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. पाचव्या कसोटीबाबत अद्यापर्यंत कोणतीही ठोस माहिती आली नसली तरी सध्या सर्व खेळाडू कोरोनाच्या संकटामुळे रुममध्येच बंद आहेत. शास्त्री हे ५ सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आढळले होते. त्याची फ्लो टेस्ट करण्यात आली होती.

हे ही वाचा:

ही आहे ठाकरे सरकारची ‘ऐतिहासिक’ कामगिरी

‘दादा’ लवकरच रुपेरी पडद्यावर

खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी

बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम

भरत अरुण, आर. श्रीधर आणि नितिन पटेल यांना विलगीकरणात ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर शास्त्रींसह अरुण आणि श्रीधर हे देखील कोरोनाबाधित आढळे आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी दरम्यान हे सर्वजण विलगीकरणात असतील. दरम्यान या सर्वांना कोरोनाची लागण ही सामन्यादरम्यान झाली नसून एका खाजगी कार्यक्रमावेळी झाली आहे. शास्त्री हे त्यांच्या नव्या पुस्तकाच्या अनावरणासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये असताना या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कारण या कार्यक्रमाला बाहेरुन अनेकजण आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा