राज्यात एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या यात्रेला २५ जुलैला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात होणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. यानंतर ७ किंवा ८ ऑगस्टला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर येथे सांगता होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. काय स्वरुप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय ? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यात सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष एनसीपी आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे आणि उद्धव ठाकरे गट आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत तोडगा निघणार नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा..
मौलाना रझा म्हणतात, जोडप्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित करणार, कारवाईची मागणी !
भाजपकडून नमो एक्स्प्रेस ट्रेन पंढरपूरला रवाना
केजारीवालांची प्रकृती व्यवस्थित
खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं !
जरांगे यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, त्याबाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे, त्याची विचारणा करून मग समान तोडगा काढता येईल. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की पत्र पाठवू. अजून पर्यंत वंचित आघाडीला ते पत्र मिळालं नाही. इतर पक्षांना मिळालं का याचा आमच्याकडे खुलासा नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे लोण आता फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मानत नाही. ते पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश हळूहळू पसरत चाललं आहे. कदाचित विदर्भातील वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे. या सर्व ओबीसी संघटना होत्या, त्यांची मागणी होती की वंचित जी भूमिका मांडतंय ती गावोगाव गेली पाहिजे. त्यामुळे पक्षाने असं ठरवलंय की या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची.