मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात गेल्यानंतर दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले आहे.सर्वजण एकच प्रश्न विचारत आहेत की आता आता दिल्लीचे सरकार कसे चालणार?.दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल ह्या दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री होणार? अशी अटकळ बांधली जात आहे.कारण सुनीता केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीतील आमदारांच्या बैठकीला हजेरी लावली आहे.आम आदमी पक्षाचे आमदार, मंत्री मंगळवारी( २ एप्रिल) दुपारी त्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
सुनीता केजरीवाल यांना भेटण्यासाठी आलेल्या मंत्र्यांमध्ये आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इम्रान हुसेन, राज कुमार आनंद आणि कैलाश गेहलोत यांचा समावेश आहे. याशिवाय आप आमदार प्रमिला टोकस, राजकुमारी ढिल्लन, भावना गौर आणि संजीव झा हेही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
हे ही वाचा:
‘इंडी’ गटात सावळा गोंधळ; जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीच्या बालेकिल्ल्यातून नॅशनल कॉन्फरन्सचा उमेदवार
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ४३ लाख रुपयांचे बक्षीस असणारे दोन नक्षलवादी ठार!
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दिले आव्हान, ‘आधी त्या भारतीय साड्या पेटवा!’
अन्सारीच्या मृत्यूनंतर तुरुंग अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी!
हिंदुस्तान लाइव्हच्या बातमीनुसार, या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या आपच्या एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. कारण सत्ताधाऱ्यांकडून आमदार फोडणे आणि नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले जात आहे.