भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपद राखण्याची मोहीम आजपासून सुरु होत आहे. तिने यापूर्वी दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. तसेच जागतिक स्पर्धा मालिकेच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे आत्मविश्वास उंचावलेली सिंधू सर्वश्रेष्ठ खेळ करण्यासाठी तयार आहे.
सलग तीन स्पर्धेत सिंधूने उपांत्य फेरी गाठली आहे. इंडोनेशियाची माघार तसेच कॅरोलिन मरीन आणि नोझोमी ओकुहराच्या अनुपस्थितीत सिंधुसमोरील आव्हान काहीसे सोपे झाले असले, तरी ड्रॉ मात्र सिंधुसाठी अवघडच आहे.
या सरत्या वर्षात जागतिक विजेतेपद राखण्याचा तिचा मानस आहे. सिंधूला पहिल्या फेरीत बाय आहे. मात्र त्यानंतर तिची लढत मार्टिना रेपिस्काविरुद्ध आहे. ही लढत जिंकल्यास पॉर्नपावीसोबत सिंधूची लढत आहे. यात यश मिळाल्यास तै झु सोबत अंतिम लढत अपेक्षित आहे.
“पॉर्नपावी सध्या चांगलीच बहरात आहे. ती सिंधूचा नक्कीच कस पाहणार आहे. यापूर्वी सिंधू तिच्याविरुद्ध दोनदा पराभूत झाली आहे. त्यामुळे सिंधूला यावेळी स्मार्ट खेळ खेळावा लागेल. तसेच नव्याने व्यूहरचनाही करावी लागणार आहे.” असे बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
पुणे व ठाण्याचे दोन्ही संघ खोखो उपांत्य फेरीत
शिवसेना हा नाच्यांचाच पक्ष झालेला आहे
महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस
जिथे भगवा ध्वज उखडला; तिथेच हिंदूंनी उभारला १०८ फुटी ध्वजस्तंभ
दरम्यान, साईना नेहवालच्या माघारीमुळे महिला एकेरीत सिंधूवरच भारताची जबाबदारी आहे. तर पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, साई प्रणित, एच एस प्रणय यांचा सहभाग आहे. सात्विकसाईराज विरुद्ध चिराग शेट्टी तसेच अश्विनी पोनप्पा विरिध सिक्की रेड्डी हे दुहेरीत आव्हान निर्माण करतील अशी अपेक्षा आहे. चिराग – सात्विकलाही सिंधुप्रमाणेच सलामीला पुढे चाल आहे.