तेलंगणात विधानसभा निवडणुकीला एक आठवडा शिल्लक असल्याने राज्यातील पक्षाचे नेते आप-आपल्यापरीने प्रचाराचा बार उडवत आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा प्रचार करण्यात जोर धरला आहे.जर बीआरएस पक्ष पुन्हा जिंकून आल्यास तरुण मुस्लिमांसाठी खास माहिती तंत्रज्ञान पार्क उभारणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिले आहे. महेश्वरम येथे एका निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव बोलत होते.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. महेश्वरम येथे निवडणूक प्रचारादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत रक्षा समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव (KCR) यांनी त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास तरुण मुस्लिमांसाठी खास माहिती तंत्रज्ञान पार्क उभारण्याचे आश्वासन दिले आहे.महेश्वरम विभागातून बीआरएस पक्षाकडून शिक्षण मंत्री सबिता इंद्रा रेड्डी हे निवडणूक लढणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडणार आहेत.
हे ही वाचा:
गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!
‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’
रिंकू सिंहचा विजयी षटकार; परंतु ना त्याला फायदा झाला, ना संघाला
विजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!
सभेला संबोधित करताना के चंद्रशेखर राव म्हणाले, “आज आम्ही तरुण मुस्लिमांबद्दल विचार करत आहोत आणि त्यांच्यासाठी हैदराबादजवळ एक खास आयटी पार्क उभारणार आहोत. हे आयटी पार्क पहाडी शरीफजवळ उभारण्यात येणार आहे,असे पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले.
केसीआर पुढे म्हणाले की, आमचे सरकार सर्व लोकांना समान वागणूक देते व सर्वांना समान संधी यावर विश्वास ठेवते.आज आम्ही जी पेन्शन देत आहोत त्याचा लाभ मुस्लिमांनाही होत आहे.आम्ही निवासी शाळा उघडल्या आहेत, ज्यामध्ये मुस्लिम विद्यार्थीही शिकत आहेत.आम्ही सर्वाना सोबत घेऊन पुढे जात असल्याचे ते म्हणाले.