शाळा, महाविद्यालयांना दिवाळीनंतरचा मुहूर्त

शाळा, महाविद्यालयांना दिवाळीनंतरचा मुहूर्त

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये उघडण्याची चिन्हे दिसत नसतानाही राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळा सुरू कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. आज (२३ सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबईत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील २ ऑक्टोबर पर्यंतची कोरोना परिस्थिती बघायची. परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. शाळांबाबत बोलताना ते म्हणाले की, लहान मुलांच्या लसी आल्या आणि त्यांचे लसीकरण झाले की दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे. तेव्हा त्याबाबत मुख्यमंत्री आढावा घेतली, असे पवार म्हणाले.

हे ही वाचा:

क्वाड लवकरच भारतात बनवणार एक अब्ज लसी

मोदींच्या अमेरिका भेटीतून मिळणार सशस्त्र ड्रोन?

‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार

जावेद अख्तर माफी मागा…संघावरील टीका भोवणार

दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर २० दिवस कोरोनाची स्थिती पाहून आणि तिसऱ्या लाटेची साधारण शक्यता पाहून त्यानुसार निर्णय घ्यावा, अशा सूचना पेडीएट्रीक टास्क फोर्सने राज्य सरकारला केल्या आहेत. याआधीही पेडीएट्रीक टास्क फोर्सने शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झाल्यास आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचना पालन करण्याची पूर्ण तयारी झाल्यावर शाळा सुरू कराव्यात असे मत मांडले होते.

लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने मागवली असून शाळा सुरू करण्यासाठीची पूर्व तयारीही सुरू केली आहे. मुंबईतील शाळा सुरू करण्याचे निर्णय आयुक्त घेतील. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची शक्यता जरी असली तरी विविध जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतील.

मुलांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता पालकांकडूनही शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरून आहे. यासंदर्भात अनेक सर्वेक्षण केलेले असून त्याच्या अहवालानुसार बहुतांश पालक हे प्रत्यक्ष शाळा सुरू व्हाव्यात या मताचे आहेत.

Exit mobile version