मुंबई १०० टक्के अनलॉक होणार?

मुंबई १०० टक्के अनलॉक होणार?

Thane: Commuters board a crowded train as authorities permitted all members of the general public to travel in local trains, after a gap of about 320 days owing to the coronavirus pandemic, in Thane, Monday, Feb. 1, 2021. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI02_01_2021_000031B)

कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट लक्षात घेता मुंबईत लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यात येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिनाअखेरीपर्यंत मुंबई शहर १०० टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहरात सध्या दररोज ५०० पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत असून संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे.

ओमायक्रोन संसर्गामुळे देशासह शहरात देखील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला होता. त्यामुळे राज्यात आणि शहरात निर्बंध लादण्यात आले होते. रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला होता. समारंभ, सोहळे यावरही बंधने घालण्यात आली होती. लसीकरण मोहिमेला वेग आला होता. आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात येत आहेत. तसेच येत्या आठवड्याभरात मुंबईत १०० टक्के पात्र नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव

देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!

ठाण्यात भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले

‘सिद्धू यांच्या रक्तात पंजाब, हवे तर कापून बघा’

रुग्ण संख्येची घट लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच पालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाट्यगृहे , थीम पार्क, स्विमिंग पूल ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्येही ५० टक्के उपस्थितीला परवानगी दिली. यासोबतच लग्नसमारंभासाठी २०० जणांच्या उपस्थितला परवानगी आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे निर्बंध आणखी शिथिल करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून सोमवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये ३५६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कोरोना दुपटीचा दर ७६० दिवासांवर आला आहे.

Exit mobile version