लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (३ एप्रिल) मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, जेव्हा भाजपा सरकार हटवले जाईल तेव्हा हे वक्फ विधेयक रद्द केले जाईल. वक्फ विधेयकाद्वारे देशाचे विभाजन केल्याचा भाजपावर त्यांनी आरोपही केला. भाजपावर हल्ला करताना त्या म्हणाल्या, भाजपने देशाचे विभाजन करण्यासाठी हे विधेयक आणले आहे. जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार काढून टाकले जाईल आणि नवीन सरकार स्थापन होईल तेव्हा (हे) वक्फ विधेयक रद्द करण्यासाठी एक दुरुस्ती केली जाईल.
लोकसभेत तृणमूल काँग्रेसने विधेयकाच्या विरोधात मतदान केले. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ‘वक्फ सुधारणा विधेयक’ हे राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचे म्हटले आणि संसदेला या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला. सभागृहात विधेयकावरील चर्चेत भाग घेताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, मुस्लिमांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकार आहे आणि वक्फ मालमत्ता ही मुस्लिम समुदायाची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे.
या विधेयकाला त्यांनी विरोध केला आणि म्हणाले, असे कायदे करण्याचा अधिकार फक्त राज्यांना आहे आणि हे विधेयक पूर्णपणे असंवैधानिक आहे. संसदेच्या माध्यमातून राज्य विधिमंडळाच्या अधिकारांवर अशा प्रकारे अतिक्रमण करता येणार नाही, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले.
हे ही वाचा :
“वक्फ (सुधारणा) विधेयकाचा गाभा म्हणजे देशाच्या संविधानापेक्षा कोणीही वर नाही”
दिल्लीत वक्फ विधेयक मंजूर, गुजरातेत समान नागरी कायद्याची तयारी
केनियन नागरिक असलेल्या महिलेला अटक, २० कोटींचे कोकेन जप्त
दरम्यान, मोदी सरकारने लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर करून घेतले आहे. एनडीएच्या खासदारांनी विधेयकाला पाठींबा दिला तर विरोधकांनी एकजूट दाखवत तीव्र विरोध केला. यानंतर आता सरकारने राज्यसभेत हे विधेयक आणले असून यावर चर्चा सुरु आहे.