मुस्लिमांना महाकुंभात येऊन दुकान मांडता येईल का?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तराची चर्चा 

मुस्लिमांना महाकुंभात येऊन दुकान मांडता येईल का?

प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभाची सध्या देशभर चर्चा आहे. देशभरातील लाखो भक्त महाकुंभ मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. याच दरम्यान अनेक दिवसांपासून महाकुंभात मुस्लीम प्रवेश आणि दुकाने मांडण्वयारून सातत्याने वाद सुरू आहे. अनेक ऋषी-मुनी मुस्लिमांच्या प्रवेशाला आणि महाकुंभात दुकाने मांडण्याच्या विरोधात आहेत. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आज तकच्या ‘धर्म संसद’मध्ये या कार्याक्रमामध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ बोलत होते. यादरम्यान मुख्यमंत्री योगींनी कुंभमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशाबाबतही मोठं वक्तव्य केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्रद्धावान लोकांचा हा मोठा मेळावा आहे. भारताच्या चिरंतन परंपरांबद्दल ज्यांना आदर. श्रद्धा आहे येथे यावे. त्यांच्यावर कोणतेही बंधने नाहीत, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. यासोबतच मुख्यमंत्री योगी म्हणाले, असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही काळात काही दबावाखाली इस्लाम स्वीकारला. आजही त्या लोकांना भारताच्या परंपरेचा अभिमान वाटतो.

यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वक्फ बोर्डाबाबत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, हे वक्फ बोर्ड आहे की भूमाफियांचे बोर्ड? ज्या ठिकाणी वक्फ बोर्डाने ताबा घेतला आहे, त्याठिकाणी सखोल चौकशी करून ती जमीन मूळ मालकाला परत करण्यात येईल. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले की, हिंदू धर्माशी संबंधित कोणतेही पवित्र स्थान, सरकारी जमीन किंवा सार्वजनिक वापराच्या जमिनीवर कब्जा करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

हे ही वाचा : 

वणवा घरापर्यंत पोहोचला, पण आपले घर त्यांनी सोडले नाही!

महाकुंभ मेळाव्यानिमित्त आकाशवाणीकडून ‘कुंभवाणी’

बिहारच्या माजी मंत्र्यासह अनेकांवर ईडीचे छापे

माविआकडून जागावाटपात चुका झाल्यात; त्या स्वीकारल्या पाहिजेत

 

Exit mobile version