भारतीय टीमचा संकटमोचक, संघाला गरज असताना संघासाठी धावून येणारा बूम बूम गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. जगातील सर्वात घातक गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचा दबदबा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक पराक्रम केले आहेत. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तो मुंबईच्या महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे. पण एक वेळ अशी आली होती की, मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला बुमराहला संघाबाहेर काढायचे होते. पण त्यावेळेस कर्णधार रोहित शर्मा त्याच्या बाजूने उभा राहीला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितच्या विश्वासामुळे बुमराहला पुढे खेळण्याची संधी मिळाली आणि बुमराहने विश्वास सार्थ करून दाखविला.
पार्थिव पटेलने जिओ सिनेमावर बुमराहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. २०१५ मध्ये बुमराहची कामगिरी संघ व्यवस्थापनाला रुचली नाही. संघ व्यवस्थापनाला बुमराहला बाहेरचा रस्ता दाखवायचा होता. पण त्यानंतर रोहितने बुमराहवर विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे बुमराहला पुढील मोसमात खेळण्याची संधी मिळाली. इतकंच नाही तर बुमराहला सीझनच्या मध्यावर काढून टाकण्यात येणार होते. पण रोहितने बचाव केला होता. मात्र, याबाबत रोहित किंवा बुमराहकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.
पदार्पणाच्या मोसमात २ सामने खेळला
बुमराहने आयपीएल २०१३ मध्ये पदार्पणाचा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने विराट कोहली, मयांक अग्रवाल आणि करुण नायर यांना तंंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने २०१३ मध्ये फक्त २ सामने खेळले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्याने ११ सामने खेळले. बुमराहने या मोसमात ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०१५ मध्ये त्याला केवळ ४ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. बुमराहने या मोसमात ३ विकेट्स घेतल्या होत्या. पण त्यानंतर त्याचा आलेख वाढतच गेला. बुमराहने २०१६ मध्ये १४ सामने खेळत १५ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा :
अनिल परबांकडून रमजान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी
दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!
अश्लील आणि हिंसक कंटेंट दाखविणारे १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्स ब्लॉक
भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतून २५ खासदारांचा पत्ता कट
दमदार कामगिरी
बुमराहने आयपीएलमध्ये आतापर्यंत १२० सामने खेळले आहेत. यात त्याने १४५ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १० धावांत ५ विकेट्स. त्याने २०२२ मध्ये १४ सामने खेळले होते आणि १५ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने २०२१ च्या १४ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या होत्या. तर २०२० मध्ये २७ विकेट्स काढल्या होत्या.