27 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषजानेवारीत होणार आयपीएल मेगा लिलाव?

जानेवारीत होणार आयपीएल मेगा लिलाव?

Google News Follow

Related

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदायी बातमी असून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयपीएल (IPL) मेगा लिलाव पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. ‘इनसाइड स्पोर्ट’ वेबसाईटला एका बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआय जानेवारी २०२२ मध्ये आयपीएल मेगा लिलाव आयोजित करण्याची योजना आखत आहे.

‘इनसाइड स्पोर्ट’ वेबसाइटशी बोलताना, बीसीसीआयच्या एका वरिष्ठाने म्हटले आहे की, आयपीएल २०२० मेगा लिलाव जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापूर्वी होण्याची शक्यता नाही. बीसीसीआयने फ्रॅन्चायझींना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल २०२० मेगा लिलावासाठी तयार राहण्यास सांगितले होते. अहमदाबाद फ्रँचायझी संबंधित समस्यांमुळे हा मेगा लिलाव लांबणीवर पडला आहे आणि बीसीसीआयला मेगा लिलावपूर्वी अहमदाबाद फ्रँचायझी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करायचे असल्याचे वृत्त ‘डीएनए’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

हे ही वाचा:

‘सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत’

पाकिस्तानी बोटीतून जप्त केले ४०० कोटींचे हेरॉइन

माफी मागितली! आता पुन्हा बडबड सुरू…

मल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती

काही आठवड्यांपूर्वी दुबईमध्ये झालेल्या लिलावात अहमदाबाद फ्रँचायझी सीवीसी (CVC) कॅपिटलने विकत घेतली होती. मात्र, नंतर सीवीसी कॅपिटल स्पोर्ट्स बेटिंगमध्ये गुंतलेली आहे, असे समोर आले त्यामुळे त्यांची मालकी रद्द करणे आवश्यक आहे. या सर्व समस्या दूर झाल्यावर मेगा लिलाव होणार आहे.

आठ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

  • मुंबई इंडियन्स-  रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर-  विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज
  • पंजाब किंग्स- मयंक अग्रवाल आणि अर्शदिप सिंग
  • सनरायजर्स हैदराबाद- केन विल्यमसन, अब्दूल समाद आणि उमरान मलिक
  • चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंग धोनी, रविंद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड
  • दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि नॉर्खिया
  • कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसेल, वरूण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर
  • राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन, जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा