लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीमध्ये जिंकून भारत आघाडी वाढवण्यासाठी तर इंग्लंडचा संघ तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी भारतीय संघाचा विचार करता संघात दोन बदल होऊ शकतात. संघात होऊ शकणारे दोन्ही बदल हे मधल्या फळीतील फलंदाजीसह गोलंदाजीत दिसू शकतात. त्यामुळे वरच्या फळीतील फलंदाजी पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच असू शकते. संघात होणाऱ्या बदलांपैकी एक बदल म्हणजे रवींद्र जाडेजाच्या जागी आर अश्विनला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे इशांत शर्माच्या जागी शार्दूल ठाकूरला खेळवलं जाऊ शकतं. जाडेजा एकही विकेट घेऊ शकला नसल्याने त्याला विश्रांची दिली जाऊ शकते. तर फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी शार्दूलला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. इंग्लंडचा मार्क वुड दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्या नसेल. तर फलंदाज डेव्हिड मलान तसेच ऑली पॉप यांच्यासह गोलंदाज महमूद याला इंग्लंड संघात स्थान दिलं जाऊ शकतं.

हे ही वाचा:

नारायण राणे यांचं काही चुकलं नाही

सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट

मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही

महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारी २५ ऑगस्ट रोजी लीड्स येथील हेंडिग्ले मैदानात खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार असून ३ वाजता नाणेफेक करण्यात येईल. हा तिसरा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

Exit mobile version