28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषहार्दिक पंड्याचे वर्ल्ड कप तिकीट कापणार? 

हार्दिक पंड्याचे वर्ल्ड कप तिकीट कापणार? 

रोहित शर्माने घेतली अजित आगरकर आणि राहुल द्रविडची भेट 

Google News Follow

Related

हिटमॅन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अजित आगरकर आणि राहुल द्रविडची भेट घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या धुमधडाक्यात मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली आहे. यांच्यात टी-२० वर्ल्ड कप टीमची चर्चा झाली. या चर्चेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबाबतही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पंड्याचा खराब फॉर्म अडचणीचे कारण बनला आहे. हार्दिक पंड्या गोलंदाज म्हणूनही अपयशी ठरला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याला टी-२० विश्वचषक संघातून वगळले जाण्याची शक्यता बोलली जात आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकासाठी उपलब्ध नसणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर जसप्रीत बुमराहच्या जोडीदाराच्या शोधात आहेत. मोहम्मद सिराजचा अलीकडचा फॉर्म अत्यंत निराशाजनक आहे.

हेही वाचा :

सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या हत्येप्रकरणी पाककडून भारतावरच आरोप!

“व्याज दर कमी ठेवून आर्थिक प्रगती होत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी युपीएचा आरबीआयवर दबाव”

झेलम नदीत बोट उलटली; विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता

इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!

हार्दिक पंड्याला संधी मिळेल?
मोहम्मद शमी खेळणार नसल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हार्दिक पंड्याचा खराब फॉर्म असूनही त्याला टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकते, असे बोलले जात आहे. वास्तविक, भारतीय संघ व्यवस्थापन वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याला महत्त्व दिले जाऊ शकते.

हार्दिक पंड्याचा फ्लॉप शो…
हार्दिक पंड्या सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत आहे. परंतु आतापर्यंत तो या मोसमात फलंदाजीशिवाय गोलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. तसेच हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावरही सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स ६ सामन्यांत ४ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा