30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषयावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार आहे का?

यावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार आहे का?

Google News Follow

Related

ताऊक्तै वादळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळ आले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. परंतु मागच्या वर्षी महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली होती, त्याची नुकसानभरपाई अद्यापी अनेकांना मिळाली नसताना आतातरी ठाकरे सरकार वादळग्रस्तांना मदत करणार का असा सवाल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

आज सकाळपासून वादळाने आपला प्रभाव मुंबईवर दाखवायला सुरूवात केली आहे. मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, तर त्यासोबात सोसाट्याचा वारा देखील वाहत आहे. वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून जाऊन त्या ठिकाणी पाणी भरले आहे. कोकण प्रांतातसुद्धा आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा पाऊस यांचा एकत्रित तडाखा किनारपट्टील बसला आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार आणि व्हेंटिलेटर गफला

तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली

…आणि इस्लामिक देश आपापसातच भांडले

कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू

मागील वर्षी देखील निसर्ग चक्रीवादळाने आपला प्रभाव कोकण भागात दाखवला होता. त्यावेळी ठाकरे सरकारने नुकसानभरपाई जाहीर देखील केली होती. परंतु अद्यापी अनेकांना ती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी यापूर्वी देखील ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता ताऊक्तै वादळाचा प्रत्यक्ष तडाखा बसून, नुकसान झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ते ट्वीटमध्ये म्हणतात की,

चक्रीवादळाच्या तांडवामुळे राज्याच्या कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा बसल्याचे वृत्त आहे. मुंबईतही अनेक घरांची छपरे उडाली असून लोकांच्या घरात पाणी गेले आहे. यावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार आहे का?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा