दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच केले होते.भारताच्या या दोन दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यावर अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने सांगितले की, या समस्येत अमेरिका हस्तक्षेप करणार नाही, तरीही भारत आणि पाकिस्तानने तणाव टाळून संवादाद्वारे तोडगा काढावा’, असा सल्लाही अमेरिकेने दिला आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी मंगळवारी(१६ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ‘भारत दहशतवाद्यांना त्यांच्या घरात मारण्यास मागेपुढे पाहणार नाही’ या वक्तव्यावर बिडेन प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आला होता.यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, अमेरिका यात सहभागी होणार नाही. परंतु भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही तणाव टाळण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो.
हे ही वाचा:
महेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट का सोडला?
रामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत रामभक्तांची अलोट गर्दी
दाऊद छोटा शकील गँगच्या नावे एकनाथ खडसेंना धमकीचे फोन
कोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचल्याबद्दल अमेरिकेने भारतावर कोणतेही निर्बंध का लादले नाहीत, असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला.त्यावर ते म्हणाले की, मी कधीही कोणत्याही प्रतिबंध कारवाईचे पूर्वावलोकन करणार नाही, याचा अर्थ असा नाही की, कारवाई होणार नाही.पण जर तुम्ही मला बंदीबद्दल बोलण्यास सांगितले तर ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही उघडपणे चर्चा करत नाही.
दरम्यान, देशात कोणत्याही दहशतवाद्याने कोणत्याही प्रकारची घटना घडवली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. तसेच भारतात दहशतवादी घटना घडवून एखादा दहशतवादी पाकिस्तानात पळून गेला तर आम्ही पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते.एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते.संरक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचाही तिळपापड झाला होता.