धोनी मुख्य प्रशिक्षकासाठी स्टीफन फ्लेमिंगचे मन वळविणार?

धोनी मुख्य प्रशिक्षकासाठी स्टीफन फ्लेमिंगचे मन वळविणार?

टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. राहुल द्रविडच्या जागी भारतीय संघ नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. भारतीय संघ राहुल द्रविडच्या जागी स्टीफन फ्लेमिंगसाठी उत्सुक आहे. परंतु स्टीफ फ्लेमिंगने ही ऑफर धुडकारली आहे. फ्लेमिंगने ऑफर नाकारल्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची ऑफर स्विकारण्यासाठी भारताचा माजी कर्णधार धोनी स्टीफन फ्लेमिंगचे मन परिवर्तन करतो का, यावर लक्ष लागले आहे. महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

स्टीफन फ्लेमिंगचे धोनी मनपरिवर्तन करेल का?
स्टीफन फ्लेमिंगचे मन वळवण्याची जबाबदारी आता महेंद्रसिंग धोनीवर आहे. स्टीफन फ्लेमिंगची समजूत काढण्यात माही यशस्वी झाला, तर हा माजी किवी कर्णधार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार हे जवळपास निश्चित आहे. खरं तर स्टीफन फ्लेमिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांची बॉन्डिंग खूप मजबूत मानली जाते. जवळपास १६ वर्षांपासून दोघे एकत्र काम करत आहेत. स्टीफन फ्लेमिंग आयपीएल २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. यानंतर स्टीफन फ्लेमिंग यांना आयपीएल २००९ पूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. तेव्हापासून ते सातत्याने चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत.

चेन्नई सुपर किंग्जच्या यशामागे स्टीफन फ्लेमिंग
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएल जिंकली आहे. या यशामागे स्टीफन फ्लेमिंगचा मोठा हात असल्याचे मानले जात आहे. सध्या टीम इंडिया राहुल द्रविडच्या जागी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यासाठी बीसीसीआयची पहिली पसंती स्टीफन फ्लेमिंग आहे. पण तो सध्या चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त इतर अनेक संघांना प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचे नाही.

हेही वाचा :

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ

आधी ‘लेडी सिंघम’ होते, आता भाजपाची एजंट? स्वाती मालीवाल यांचा सवाल

इंडी आघाडी देशाचे विभाजन करणारी, ते देशाला पुढे काय नेणार?

विमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोंचा मृत्यू

या संघांची जबाबदारी
स्टीफन फ्लेमिंग हे चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त टेक्सास सुपर किंग्ज, जोहान्सबर्ग सुपर किंग्ज आणि साउदर्न ब्रेव्हचे प्रशिक्षक आहेत.

Exit mobile version