‘नवाब मलिक यांच्या विरोधात प्रचार करणार’

भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी स्पष्ट केली भूमिका

‘नवाब मलिक यांच्या विरोधात प्रचार करणार’

मानखुर्द शिवाजी नगर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एबी फॉर्मद्वारे नवाब मलिक यांनी निवडणूक अर्ज भरल्या नंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. मानखुर्द शिवाजी नगरमध्ये भारतीय जनता पक्षानुसार शिवसेनेचे सुरेश कृष्णराव पाटील उर्फ ​​बुलेट पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे आमचे भाजप कार्यकर्ते मानखुर्द शिवाजी नगरमध्ये फक्त सुरेश पाटलांचा प्रचार करणार असून नवाब मलिक यांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना एबी फॉर्म देऊन उमेदवार घोषित केले आणि त्यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. यानंतर विरोधक विविध वक्तव्ये करून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करत नवाब मलिक यांना पाठींबा देणार नाही आणि प्रचारही करणार नसल्याचे म्हटले. याच दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी भारतीय जनता पक्ष नवाब मलिकांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले.

हे ही वाचा : 

पूर्व लडाख सीमेवरील डेपसांग, डेमचोक पॉईंट्सवरून लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण

राज ठाकरे म्हणाले, राज्यात पुढचा मुख्यमंत्री भाजपचा!

पाईपलाईन खोदकामादरम्यान सापडले ‘ब्रिटीश कालीन बॉम्ब’

नवी मुंबईच्या सोसायटीत मुस्लिमांकडून दिवाळीसाठी रोषणाई करण्यास जोरदार विरोध

रिपब्लिक भारत वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “नवाब मलिक यांनी निवडणूक लढवू नये, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती, आहे आणि राहील. मला तुमच्या माध्यमातून कळले कि राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या घटकेला नवाब मलिक यांना फॉर्म दिलाय, पण आमचा भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचा उमेदवार बुलेट पाटील आधीच तिथे उभा आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे उमेदवार बुलेट पाटील यांचा खुलेआम प्रचार करेल, आम्ही नवाब मलिक यांच्या विरोधात प्रचार करू.”

विरोधकांचे दावे फेटाळून लावत अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्याशी असलेल्या महाविकास आघाडीच्या संबंधांचा पुनरुच्चार करत मविआचा दुटप्पीपणा उघड केला. ते म्हणाले, “आम्ही नवाब मलिक यांच्यावर आरोप केले तेव्हा मविआने नवाब मलिक यांचा राजीनामा स्वीकारण्यास विरोध केला, त्यांना मंत्रिमंडळात ठेवलं. एवढंच नाही तर जेंव्हा नवाब मलिक तुरुंगात गेले तेव्हा देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही. तेच लोक आज आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवत आहेत. हाच मोठा विनोद आहे. आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे, आम्ही तिथे शिवसेनेचा उमेदवार दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने नवाब मलिक यांच्यासाठी प्रचार करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला पक्षविरोधी गतिविधी मानण्यात येईल हेही मी आज स्पष्ट करतो, असे भातखळकर म्हणाले.

Exit mobile version