रेल्वेच्या मोटरमनकडे बुलेट ट्रेनचे सारथ्य?

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने मागविले अर्ज

रेल्वेच्या मोटरमनकडे बुलेट ट्रेनचे सारथ्य?

देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून २०२७ पर्यंत ही ट्रेन लोकांच्या सेवेत येणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) या गाडीचे सारथ्य करण्यासाठी म्हणून सारथी शोधण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने बुलेट ट्रेन ऑपरेटर आणि चालकांच्या २० पदासाठी अर्ज मागितले आहे.

‘एनएचएसआरसीएल’ने नुकतीच यांसंदर्भात जाहिरात प्रकशित केली असून या सर्वांना जापानमध्ये प्रशिक्षण देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पदासाठी रेल्वेचे लोको पायलेट, मोटरमॅन आणि मेट्रोच्या चालकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित देशातील पहिल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सध्या गुजरातमध्ये प्रगतिपथावर असून २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे; तर एनएचएसआरसीएलकडून बुलेट ट्रेन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तयारी सुरु करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज

‘न्यूझीलंडवरील हल्ल्यानंतर मोहम्मद शमीला अटक करू नका’

पाकिस्तानच्या वाईट कामगिरीनंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार

गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२३ आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या अर्जदारांना प्रशिक्षण जपानमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या २० पदांसाठी अर्ज मागितले असून याशिवाय काँट्रॅक्टस, रोलिंग स्टॉक, रोलिंग स्टॉक डेपो, डेटाबेस प्रशासन, ट्रॅक मानव संसाधन, वित्त आणि आर्किटेक्चर या पदासाठी देखील अर्ज मागविण्यात आले आहेत.

Exit mobile version