‘वेद, पुराण, महाभारताच्या माध्यमातून भविष्यासाठी सज्ज राहणार’

लष्करप्रमुख मनोज पांडे यांचे प्रतिपादन

‘वेद, पुराण, महाभारताच्या माध्यमातून भविष्यासाठी सज्ज राहणार’

भारतीय लष्कर ‘उद्भव’ योजनेंतर्गत महाभारताचे युद्ध, मौर्य, गुप्त आणि मराठे यांसारख्या सुप्रसिद्ध योद्ध्यांच्या धाडसी कारवाया आणि त्यांच्या राजवटीतील भारताच्या समृद्ध वारशाचा अभ्यास करत असल्याचे प्रतिपादन लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सांगितले. या योजनेचे उद्दिष्ट देशाच्या संरक्षण क्षेत्राला मजबूत करणे हे आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी करण्यात आली होती. या अंतर्गत वेद, पुराण, उपनिषदे आणि अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासात, भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वानांदरम्यान उल्लेखनीय बौद्धिक समानता दिसून आली आहे.

ते १८७० मध्ये स्थापन झालेल्या भारतातील सर्वात जुन्या थिंक टँक, युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन (यूएसआय) द्वारे आयोजित ‘भारतीय धोरणात्मक संस्कृतीतील ऐतिहासिक उदाहरणे’ या परिषदेत बोलत होते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी सुरू केलेल्या भारतीय लष्कराच्या उद्भव प्रकल्पाविषयी ते बोलत होते. या योजनेचे उद्दिष्ट आधुनिक सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक अद्वितीय व समग्र दृष्टिकोन तयार करताना समकालीन सैन्य प्रथांसोबत प्राचीन ज्ञानाचा वापर करणे हे आहे. कित्येक वर्षे जुन्या ज्ञानाला समकालीन सैन्य शिक्षणाशास्त्राला जोडून घेण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘या योजनेत वेद, पुराण, उपनिषदे आणि अर्थशास्त्रांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला गेला आहे, जो परस्पर संबंध, धार्मिक विचार आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे,’ अशी माहिती लष्करप्रमुखांनी दिली.

‘आम्ही यात भारताच्या समृद्ध सैन्य वारशाला आकार देणाऱ्या महाभारतातील युद्ध, मौर्य, गुप्त आणि मराठा यांच्या कार्यकाळातील सर्वोत्कृष्ट युद्धनितीचा अभ्यास केला आहे,’ असे लष्करप्रमुख म्हणाले. या योजनेने भारताच्या विविध परंपरा, मराठा नौदलाचा वारसा आणि लढाऊ सैन्य, विशेषतः साहसी कारवायांना पुन्हा उजळा देऊन त्याचा नव्या क्षेत्रात वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

लंडन सिंगापूर विमान अचानक ६ हजार फूट खाली आले, एकाचा मृत्यू

धोनी मुख्य प्रशिक्षकासाठी स्टीफन फ्लेमिंगचे मन वळविणार?

आधी ‘लेडी सिंघम’ होते, आता भाजपाची एजंट? स्वाती मालीवाल यांचा सवाल

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ

भारताला महान योद्धे राजांचा इतिहास आहे, महाराजा रणजित सिंह ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी तल्लख नेतृत्व आणि युद्धकौशल्य दाखवले, असे एअर मार्शल अनिल चोप्रा (निवृत्त) यांनी सांगितले. ‘दीर्घ काळापासून, भारत पाश्चिमात्य देशांनी प्रस्तावित केलेल्या युद्धविषयक संकल्पनांचा अभ्यास करत आहे आणि त्या कदाचित आपल्या प्रदेशात आणि संदर्भात संबंधित नसतील. त्यामुळे आपला समृद्ध वारसा आम्हाला मार्गदर्शन करण्यात आणि भविष्यासाठी रणनीती बनवण्यात मोठी भूमिका बजावेल,’ असे चोप्रा म्हणाले.

Exit mobile version