सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घराचे मोजमाप सुरू, बुलडोझर चालणार?

बेकायदेशीर बांधकाम असल्याचा महापालिकेचा आरोप 

सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घराचे मोजमाप सुरू, बुलडोझर चालणार?

संभल येथील सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सपा खासदाराच्या घराचे मोजमाप सुरु झाले आहे. अधिकाऱ्यांचे एक पथक सपा खासदाराच्या घराची चौकशी करत आहे. खासदाराच्या घराचे मोजमाप सुरु असल्याचे लवकरच बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझरची कारवाई होण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षीच झियाउर रहमान बर्क यांना बांधकाम सुरू असलेल्या घराबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संभलमधील दीप सराई भागात त्यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरु आहे. मात्र, हे बांधकाम बेकादेशीर असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच वेळी, सपा खासदार म्हणतात की त्यांचे तेथे वडिलोपार्जित घर होते, जे ते पाडून बांधत आहेत. या प्रकरणी ५ डिसेंबर रोजी सपा खासदाराला नोटीस बजावण्यात आली आणि घराचा नकाशा मागितण्यात आला होता.

संभलच्या एसडीएम वंदना मिश्रा म्हणाल्या, सपा खासदार महानगरपालिकेकडून नकाशा मंजूर न करता बांधकाम करत आहेत. त्यांच्याकडून कोणतेही पुरावे सादर केले जात नाहीयेत. तसेच असा कोणताही पुरावा ते सादर करत नाहीयेत, जेणेकरून हे बांधकाम जुने आहे असे दिसेल. एसडीएम वंदना मिश्रा यांनी यासाठी एक संयुक्त पथक तयार केले आहे, जे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.

हे ही वाचा : 

२०४७ पर्यंत सपा, काँग्रेस, बहुजन समाज पक्षाचे कोणतेही भविष्य राहणार नाही

पाकिस्तान दिनी राष्ट्राध्यक्ष झरदारी यांना नीट भाषणही देता येत नाही, होत आहेत ट्रोल!

इम्युनिटी मजबुतीसाठी तुळशीचा काढा घ्या!

कुणाल कामराच्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाईचा बडगा

दरम्यान, सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्यावरही संभलमध्ये हिंसाचार पसरवल्याचा आरोप आहे. जामा मशिदीचे प्रमुख जफर अली यांच्या अलिकडेच झालेल्या अटकेनंतर, सपा खासदारावरही अटकेची तलवार टांगती तलवार आहे. संभलचे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई म्हणाले की, सपा खासदाराला लवकरच चौकशीसाठी कलम ४१(अ) अंतर्गत नोटीस बजावली जाईल. संभल हिंसाचार प्रकरणात बर्क देखील आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे.

हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची खाज... | Dinesh Kanji | Kunal Kamra | Uddhav Thackeray | Eknath S |

Exit mobile version