दिल्लीमध्ये एनडीएने बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि आपण उपस्थित राहणार असल्याही माहिती खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा..
नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांचा आयटीबीपी पोलिस कॅम्पवर हल्ला, जीवितहानी नाही!
पवईत झोपडपट्टी तोडताना पोलीस, पालिका अधिकाऱ्यांवर फेकले दगड!
रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार!
स्वप्नील सावरकर यांना ‘व्रतस्थ पत्रकारिता’ पुरस्कार
खासदार तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व ४८ मतदारसंघाच्या बाबत या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असून सर्व आमदार बोलावलेल्या बैठकीला येणार आहेत. १० तारखेला मुंबईत पक्षाचा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत.
खासदार तटकरे म्हणाले, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कसलीही चर्चा या बैठकीत झाली नाही. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असेही तटकरे म्हणाले.