“महिना १०० कोटी खंडणीचे १०० सुलभ मार्ग” असे प्रकरण अनिल देशमुखांच्या पुस्तकात असेल का?

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकरांचा सवाल

“महिना १०० कोटी खंडणीचे १०० सुलभ मार्ग” असे प्रकरण अनिल देशमुखांच्या पुस्तकात असेल का?

राष्टवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे एक पुस्तक प्रकशित होणार आहे. “डायरी ऑफ होम मिनिस्टर” असे हा पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकामध्ये १०० कोटींच्या आरोपांवर भाष्य केल्याची माहिती आहे. १०० कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना तुरुंगातही जावे लागले होते. याबाबतही “डायरी ऑफ होम मिनिस्टर” या पुस्तकात खुलासा केल्याची माहिती आहे. स्वतः अनिल देशमुख यांनी ट्वीटकरत या पुस्तकाची माहिती दिली. अनिल देशमुखांच्या या पुस्तकावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांना टोला लगावत सवाल उपस्थित केला आहे. अनिल देशमुख यांच्या पुस्तकावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया देत माझेही पुस्तक लवकरच येणार असल्याचे म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी पुस्तकाची माहिती देतात ट्वीट केले, राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये मी गृहमंत्री असताना षडयंत्र रचून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. #ED आणि #CBI च्या चौकशीचा ससेमिरा लावून मला १४ महिने तुरुंगात टाकण्यात आले. माझ्यावर दबाव टाकून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. मी तुरुंगात असताना यावर पुस्तक लिहायला घेतले होते. ते “डायरी ऑफ होम मिनिस्टर” हे पुस्तक छापून तयार झाले असून लवकरच मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत बाजारात उपलब्ध होणार आहे.

यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले. “महिना १०० कोटी खंडणीचे १०० सुलभ मार्ग” असे प्रकरण अनिल देशमुखांच्या ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ पुस्तकात असेल का?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.  

हे ही वाचा : 

बारामती मधून अजित पवार, येवल्यातून भुजबळ, परळीतून मुंडे तर कागलमधून हसन मुश्रीफ!

पुस्तक विकण्यासाठी आपली इज्जत विकली; बबिता फोगट यांची टीका

‘बटेंगे तो कटेंगे’ आशयाचे मुंबईत लागले पोस्टर्स

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : हत्येपूर्वी स्नॅपचॅटचा वापर झाला

पुस्तकांच्या मालिकेत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे देखील पुस्तक येणार आहे. अनिल देशमुख यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले. संजय राऊतांना तुरुंगात आलेल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक असणार आहे. ‘नरकातला स्वर्ग’ असे पुस्तकाचे शीर्षक असणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊतांच्या पुस्तकावर अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत टोला लगावला आहे.

तुरुंगात गेलेले नेते लिहीते झाल्यामुळे मविआमध्ये आता लेखकांची फळी निर्माण होताना दिसते आहे. अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ संजय राऊतांनीही पुस्तक लिहायची घोषणा केली असून त्याचे नावही जाहीर केलेले आहे. नाव असेल “नरकातला स्वर्ग”, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

 

Exit mobile version