संस्थापकानेच केला खळबळजनक दावा
विकिपीडियावर कोणीही विश्वास ठेवू नका, कारण डाव्यांनी त्या साईटवर ताबा मिळवला आहे असे मत त्या साईटचे सह संस्थापक लॅरी सँगर यांनी व्यक्त केले आहे. ‘अनहर्ड’ या इंग्रजी यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सँगर यांनी रोखठोक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी स्वतः बनवलेल्या ‘विकिपीडिया’ या जगप्रसिद्ध वेबसाईटवर टीका केली आहे. विकिपीडियाची विश्वासार्हता संपली असून त्या साईटने आपला तटस्थ चेहरा गमावला आहे असे सँगर यांनी सांगितले.
माहितीच्या या युगामध्ये इंटरनेटकडे माहितीचा एक महत्वाचा स्त्रोत म्हणून पहिले जाते. या महाजालावर विकिपीडिया ही माहिती वेबसाईट चांगलीच लोकप्रिय आहे. पण या वेबसाईटवर डाव्यांचा कब्जा असल्याचे स्वतः या साईटच्या सहसंस्थापकांचे म्हणणे आहे. स्वयंसेवकांमार्फत चालवली जाणाऱ्या साईटमध्ये डाव्या विचारांचे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे डाव्यांच्या अजेंड्याला साजेशी नसलेली माहिती ते साईटवर जाऊ देत नाहीत असा धक्कादायक खुलासा सँगर यांनी केला आहे. तर याच कारणामुळे विकिपीडिया वरील माहितीमध्ये वाचकांना संपूर्ण असा दृष्टिकोन मिळत नाही असा दावा सँगर यांचा आहे.
हे ही वाचा:
मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर
कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी…
मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?
ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला
२००१ साली लॅरी सँगर यांनी जिमी वेल्स यांच्या साथीने विकिपीडिया या वेबसाईटची स्थापना केली. पण ज्या हेतूने या साईटची स्थापना करण्यात आली त्या हेतूशीच प्रतारणा झाल्याचे सँगर यांचे म्हणणे आहे. २००९ च्या आधी विकिपीडिया साईटवर सर्व विचारांचे प्रतिनिधी संपादनाचे काम करायचे. सर्व विचारधारांच्या संपादकांमध्ये वाद व्हायचे की कोणता कन्टेन्ट जावा आणि कोणता जाऊ नये. पण आता तसे होत नाही. हे पटवून देताना लॅरी सँगर यांनी अमेरिकेतील काही ताजी उदाहरणे दिली आहेत. ज्यामध्ये जो बायडन पासून ते कोविड पर्यंत अनेक विषयांचा समावेश आहे.