लष्कराची गुपिते उघड केल्याची कबुली देण्यास तयार, असांज यांना सोडणार!

१५ वर्षांपूर्वी हेरगिरी केल्याचे १७ आरोप आले होते ठेवण्यात

लष्कराची गुपिते उघड केल्याची कबुली देण्यास तयार, असांज यांना सोडणार!

विकिलिक्स वेबसाइटचे संस्थापक जूलियन असांज यांची अखेर ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका झाली आहे. सोमवारी रात्री न्यायालयाकडून जाहीर झालेल्या निर्णयानुसार, जुलियन असांज यांनी अमेरिकी न्यायालयात स्वतःच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात लष्कराची गुपिते उघड केल्याची कबुली देण्यास तयार झाले. त्यामुळे गेली कित्येक वर्षे सुरू असलेली न्यायालयीन लढाई आता संपुष्टात आली आहे.

अमेरिकेच्या मारियाना येथील न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, ब्रिटनच्या ताब्यात असलेले असांज राष्ट्रीय सुरक्षा माहिती मिळवणे आणि ती जाहीर केल्याच्या एका कटात दोषी ठरवले जातील. एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, विकिलीक्सने मंगळवारी सकाळी ब्रिटिश वेळेनुसार, माहिती दिली की, जुलियन असांज स्वतंत्र आहेत आणि त्यांनी देश सोडून दिला आहे. ते अमेरिकेच्या हद्दीत स्थानिक वेळेनुसार, बुधवारी सकाळी पोहोचतील.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये चिकन कबाब, माशांच्या पदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यास बंदी!

‘बंगाल सरकारने खोटे वृत्त पसरवले’

यूपीएससीद्वारे आयोजित परिक्षांवर ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही यंत्रणेची असणार नजर

अनधिकृत हज यात्रेकरूंना सौदीला पाठविणाऱ्या बेजबाबदार ट्रॅव्हल कंपन्यांचे परवाने इजिप्तकडून रद्द

१५ वर्षांपूर्वी जुलियन असांजवर होते आरोप
जुलियन असांजवर १५ वर्षांपूर्वी हेरगिरी केल्याचे १७ आरोप ठेवण्यात आले होते. तसेच, त्यांच्या वेबसाइटवर अमेरिकी कागदपत्रे जाहीर करून कम्प्युटरचा दुरुपयोग केल्याचा आरोप होता. मूळ ऑस्ट्रेलियाचे असणारे असांजे सात वर्षे लंडनच्या इक्वाडोरच्या दूतावासात आश्रयाला होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ते लंडनच्या तुरुंगात होते. हजारो गोपनीय कागदपत्रे प्रकाशित करून असांज यांनी कथितपणे सर्वसामान्य लोकांचे जीवन धोक्यात घातले असल्याने त्यासाठी खटला दाखल करण्याची मागणी अमेरिकी अधिकारी करत होते.

मात्र असांजेविरोधातील खटला राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा बचाव पक्षांच्या वकिलांनी केला होता. असांज यांना ६२ महिन्यांची शिक्षा सुनावली जाईल, अशी आशा आहे. मात्र त्यांनी ब्रिटनमध्ये आधीच पाच वर्षांचा तुरुंगवास भोगल्यामुळे ही शिक्षा त्यांनी पूर्ण केली आहे, असे मानले जाईल. त्यामुळे ते त्यांचा मूळ देश ऑस्ट्रेलियात परतू शकतील.

Exit mobile version