जम्मू- काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) पर्यटकांवर हल्ला झाला. यात २६ पर्यटकांनी आपला प्राण गमावला. महाराष्ट्रातील पर्यटकांचाही यात समावेश होता. डोंबिवलीमधील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांनाही त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या.
पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेले अतुल मोने हे मध्य रेल्वेत नोकरीला होते. मध्य रेल्वेच्या परळ कारखान्यात वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) या पदावर अतुल मोने कार्यरत होते. सुट्टी निमित्ताने मोने हे आपल्या कुटूंबियांसह जम्मू-काश्मीर येथे फिरायला गेले होते. परंतु, दहशतीवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आता अतुल मोने यांच्या पत्नीला मध्य रेल्वेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हे ही वाचा :
पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!
पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर जाईल
सिंधू जल कराराचे स्थगन योग्य दिशेने उचललेले पाऊल
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट भारतात रिलीज होणार नाही
अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये सीनियर सेक्शन इंजिनियर पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर, रेल्वे प्रशासनाने त्यांच्या पत्नी अनुष्का मोने यांना ग्रुप सी श्रेणीतील नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असून, लवकरच नियुक्ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अतुल मोने हे २००० मध्ये ज्युनियर इंजिनियर पदावर मध्य रेल्वेत रुजू झाले होते. त्यांच्या पत्नी अनुष्का मोने यांचे एम ए पर्यंत शिक्षण झालेले असल्याची माहिती आहे. त्यानुसार त्यांना विभाग दिला जाणार आहे. त्याचसोबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून देखील आर्थिक मदत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.