आयुर्वेदामध्ये विधारा ही एक शक्तिशाली औषधी मानली जाते. जी विविध रोगांवर प्रभावी ठरते. पारंपरिक वैद्यकीय उपचारांमध्ये याचा वापर हजारो वर्षांपासून केला जात आहे. आधुनिक संशोधनानेही त्याच्या औषधी गुणधर्मांना मान्यता दिली आहे. हाडे, त्वचा, यौन स्वास्थ्य, मानसिक संतुलन आणि पचन समस्यांवर याचा विशेष उपयोग होतो.
संशोधन काय सांगते?
डिसेंबर २०१० मध्ये “नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन”द्वारे केलेल्या संशोधनानुसार, विधारामध्ये दाहशामक आणि वेदनाशामक गुणधर्म आढळतात. जे संधिवात, सांधेदुखी आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच, हे हाडे आणि स्नायूंना बळकट ठेवते.
त्वचेसाठी विधाराचे फायदे
- अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म:
- दाद, खाज, एक्झिमा आणि सोरायसिस यांसारख्या त्वचासंबंधी विकारांवर प्रभावी.
- जखम लवकर भरते:
- विधाराच्या पानांचा लेप लावल्याने जखमा लवकर भरतात.
विधारा: नैसर्गिक वियाग्रा
- संशोधनानुसार, विधारा पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या वाढवतो.
- महिलांमध्ये हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीही फायदेशीर.
मानसिक आरोग्यासाठी उपयोग
- तणाव आणि चिंता कमी करतो.
- मेंदूची कार्यक्षमता सुधारतो, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतो.
- अनिद्रा (झोप न येण्याची समस्या) दूर करतो.
पचनासाठी रामबाण औषध
- अपचन, गॅस, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.
- पचनक्रिया सुधारते.
रक्तदाब आणि मधुमेहासाठी लाभदायी
- ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो.
- उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठीही फायदेशीर.
हेही वाचा:
मायग्रेनपासून मुक्ती देणारे ‘स्वर्गीय झाड’
सौरभ भारद्वाज ‘आप’च्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी तर मनीष सिसोदिया यांना पंजाबची जबाबदारी
जालना जिल्ह्यात बेकायदेशीररित्या दिलेले ३५९५ जन्म प्रमाणपत्र रद्द
विधारा कसा घ्यावा?
- जड (मुळ) किंवा पानांचे चूर्ण दूध किंवा कोमट पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
- त्वचा विकारांसाठी पानांचे लेप लावावा.
- मुळं उकळून ते पाणी प्यायल्याने शरीरातील कमजोरी दूर होते.
निष्कर्ष
विधारा ही एक बहुगुणी आयुर्वेदिक औषधी आहे, जी अनेक आजारांवर प्रभावी ठरते. हाडे मजबूत करण्यापासून यौन आरोग्य सुधारण्यापर्यंत, तसेच मानसिक तणाव आणि पचनविषयक समस्यांवर देखील याचा चांगला परिणाम दिसतो. नियमित सेवन केल्यास संपूर्ण आरोग्यासाठी हे वरदान ठरू शकते!