26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषचांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर संध्याकाळीच का उतरणार?

चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर संध्याकाळीच का उतरणार?

Google News Follow

Related

२३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडेसहा वाजेदरम्यान कोणत्याही वेळी चांद्रयान-३ चे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरू शकते. मात्र योग्य वेळ संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांची अपेक्षित आहे. मात्र थोडे अंतर राखणे गरजेचे असल्याने हा कालावधी ठरवण्यात आला आहे. हे लँडर पूर्णपणे स्वयंचलित आहे. त्यामुळे ते अवतरणाची (लँडिंग) जागा स्वत:च निवडेल आणि उतरेल. या कामासाठी त्याला वेळ लागणार आहे.

मात्र, इस्रोने संध्याकाळच्या वेळी लँडिंगची वेळ का निवडली आहे? चंद्राच्या पृष्ठभागावर अंधारात लँडर उतरेल का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. खरे म्हणजे आपल्या पृथ्वीवर लँडिंगची वेळ संध्याकाळची असली तरी, जेव्हा चंद्रावर लँडर उतरेल, तेव्हा तिथे सूर्योदय होत असेल. ‘आम्ही ज्या वेळी विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणार आहोत, तेव्हा पृथ्वीवर संध्याकाळची वेळ असेल. मात्र चंद्रावर तेव्हा सूर्योदय होत असेल. लँडरला १४ ते १५ दिवस सूर्याकडून ऊर्जा मिळावी, जेणेकरून तो त्याच्यावर सोपवलेले सर्व वैज्ञानिक प्रयोग करू शकेल, यासाठी ही वेळ निवडण्यात आली आहे,’ असे इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले.

सूर्याच्या किरणांपासून ऊर्जा घेऊन ते चंद्रावर एक दिवस व्यतित करू शकतील, अशा प्रकारे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांची रचना करण्यात आली आहे. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांचा असतो. मात्र त्यानंतर ते काम करू शकणार नाहीत, असेही नाही. दुसऱ्यांदा सूर्योदय झाल्यानंतर ते कदाचित पुन्हा कार्यान्वित होऊ शकतात. एकदा का सूर्यास्त झाला तर लँडर आणि रोव्हर या दोघांनाही ऊर्जा मिळणार नाही आणि ते काम करू शकणार नाहीत. मात्र लँडर आणि रोव्हरमध्ये इतकी क्षमता आहे की, दुसऱ्यांदा सूर्योदय झाल्यानंतर ते पुन्हा चार्ज होऊन काम करू शकतील.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदे रात्री अचानक केईएम रुग्णालयात अवतरले

अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयानावरून उडवली खिल्ली

५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार

ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

लँडिंगनंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल आणि ते आपले प्रयोग पूर्ण करेल. प्रज्ञान रोव्हरवरही कॅमेरे आहेत. तसेच, अडथळ्यांपासून बचाव होण्यासाठी अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. प्रज्ञान रोव्हर लँडरच्या जवळ राहूनच काम करेल. ते त्यापासून जास्त दूर जाऊ शकणार नाही. जोपर्यंत विक्रम लँडर त्याच्याशी संपर्क स्थापित करू शकेल आणि नजर ठेवू शकेल, तितकेच दूर रोव्हर जाऊ शकणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा