भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-१९ लसीच्या प्रमाणपत्रात मोठा बदल केला आहे.सरकारने कोविड प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकला आहे.यापूर्वी प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो होता आणि त्यांच्या बाजूला ‘Together, India will defeat COVID-१९, अशी कॅप्शन देण्यात आली होती.मात्र, आता प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसत नाहीये.कोविड-१९ लसीच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो अचानक गायब झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.दरम्यान, यावर आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
संदीप मनुधाने नावाच्या वक्तीने आपल्या ट्विटरवरून लसीच्या प्रमाणपत्राचा फोटो शेअर केला होता.यावर त्याने लिहिले की, प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे.कोविड लसीच्या प्रमाणपत्रावर आता मोदीजी दिसत नाहीयेत.तपासणी करण्यासाठी प्रमाणपत्रावर डाउनलोड केले, परंतु त्यातून त्यांचा फोटो गायब झाला आहे, असे संदीपने म्हटले आहे.लसीच्या प्रमाणपत्रावरून अचानक पंतप्रधान मोदींचा फोटो गायब झाल्याने वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या प्रकरणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे निवेदन समोर आले आहे.
हे ही वाचा:
“शाळा भरती घोटाळ्याबद्दल तृणमूलला निवडणुकीपूर्वीच सर्व माहित होते”
दिल्ली, नोएडामधील शाळांना आलेल्या धमकीच्या ईमेलपाठी आयएसआयचा हात?
अमित शाह एडिटेड व्हिडीओ प्रकरणी ‘एक्स’कडून झारखंड काँग्रेसचे अकाऊंट बंद
द प्रिंटच्या वृतानुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे लसीकरण सर्टिफिकेट मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे.दरम्यान, कोविड लसीकरण सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.या पूर्वी २०२२ मध्ये यूपी, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, आणि गोवा या ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींचा लसीकरन प्रमाणपत्रावरून फोटो काढून टाकण्यात आला होता.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले होते.
दरम्यान, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका या करोना लसीबाबत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. या लसीची निर्मिती एस्ट्राजेनेका या कंपनीने केली आहे.या कंपनीने युनाटेड किंग्डमच्या उच्च न्यायालयात काही कागदपत्रे सादर केली होती, ज्यामध्ये कंपनीने सांगितले की, त्यांच्या कोविड-१९ च्या लसीमधून टीटीएससारखा दुर्मिळ आजार होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.एस्ट्राजेनेका लसीची अनेक देशांमध्ये कोविशील्ड आणि वॅक्सजेवरीया या नावाने विक्री करण्यात आली होती.भारतामध्ये देखील कोविशील्डची लस देण्यात आली आहे.त्यामुळेच कोरोना लसीवरून भारतात वाद सुरु आहे.