31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषदुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

Google News Follow

Related

हायपरलूप, प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी एक हाय स्पीड ट्रान्सपोर्टेशन प्रणाली, यूएईच्या आधी भारतात किंवा सौदी अरेबियात प्रथम आणली जाण्याची शक्यता आहे. असे एमिराती बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनी, डीपी वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद बिन सुलेयम यांनी रविवारी सांगितले.

१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दुबई एक्सपो २०२० च्या सहा महिन्यांच्या कार्यक्रमात बोलताना सुलेम म्हणाले की, या दशकाच्या अखेरीस हाय स्पीड वाहतूक व्यवस्था जगाच्या अनेक भागांमध्ये प्रत्यक्षात येईल.

“मी हायपरलूप भारतात प्रथम पाहणार आहे. आमची आशा अशी आहे की जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात हायपरलूप अमलात आणू तेंव्हा ते आम्हालाही फायद्याचे असेल आणि, लोकप्रियही. यामुळे विमानाच्या गतीसाठी केवळ ट्रकच्या प्रवासाचे पैसे द्यावे लागतील.” व्हर्जिन हायपरलूपविषयी बोलताना सुलेम म्हणाला .

ही प्रणाली सध्या व्हर्जिन हायपरलूपसह अनेक कंपन्यांद्वारे विकसित केली जात आहे, ज्यात दुबईस्थित पोर्ट ऑपरेटर डीपी वर्ल्डचा बहुसंख्य हिस्सा आहे.

हायपरलूपचे वर्णन सीलबंद नळी किंवा कमी हवेचा दाब असलेल्या नलिकांची प्रणाली असे करता येईल. ज्याद्वारे पॉड (प्रवाशांचा डबा) हवेचा प्रतिकार टाळून  किंवा घर्षणमुक्त प्रवास करू शकतो. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रथमच हायपरलूप पॉडमध्ये मानवी प्रवासाची चाचणी केली.

हे ही वाचा:

अमेरिकेतील मृतांचा आकडा पोहोचला सात लाखांवर

… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

आर्यन खानसह तिघांना राहावे लागणार एक दिवस कोठडीत

अवजड वाहनाच्या मालकांवर गुन्हे दाखल करणे अवघड?

डीपी वर्ल्डने यापूर्वी म्हटले होते की, हायपरलूप मालवाहतुकीमध्ये क्रांती आणू शकतो. तयार वस्तूंची यादी कमी करू शकतो आणि आवश्यक गोदामाची जागा आणि खर्च २५ टक्क्यांनी कमी करू शकतो.

फेब्रुवारी २०१८ मध्ये, व्हर्जिन हायपरलूप वनचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन यांनी महाराष्ट्रातील पुणे आणि नवी मुंबई दरम्यान हायपरलूप प्रणालीची योजना जाहीर केली होती. कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे त्या योजना तूर्तास रखडल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा