25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषएबी डिव्हिलियर्सवर वंशभेदाचा आरोप का झाला?

एबी डिव्हिलियर्सवर वंशभेदाचा आरोप का झाला?

Google News Follow

Related

दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सवर वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाबरोबर वांशिक भेदभावाचा आरोप झाला आहे. करिअरच्या सुरुवातीला रबाडाला राष्ट्रीय टीमपासून दूर करावं, अशी डिव्हिलिर्सची अपेक्षा होती, असा एबीडीवर आरोप आहे. आपल्यावरती लावलेल्या या आरोपांचं एबीडीने खंडन केलं आहे. माझा सल्ला संघाच्या भल्यासाठी होता. डिव्हिलियर्सचं स्पष्टीकरण दक्षिण अफ्रिकेच्या सामाजिक न्याय आणि राष्ट्र-निर्माणाच्या सुनावणीवेळी दक्षिण अफ्रिकेचे माजी सिलेक्टर हुसेन मनेक यांच्या आरोपानंतर आले.

मानेकने डिव्हिलियर्सवर वांशिक आधारावर निर्णय घेतले गेल्याचा आरोप लावला. आरोपांना उत्तर देताना डिव्हिलियर्सने रबाडाला क्रिकेटच्या दुनियेतील सर्वोत्तम बोलर्स म्हटलं. डिव्हिलियर्सने ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटलं “मला कधीच असं वाटलं नाही की रबाने राष्ट्रीय संघाबाहेर रहावं किंवा जावं. हा विचारच मुळात हास्यास्पद आहे. तो जागतिक क्रिकेटमधील एक गुणी आणि सर्वोत्तम बोलर आहे.

रबाडाला २०१५ च्या भारत दौऱ्यात एकही मॅच खेळायला मिळाली नाही. मी एक दिवस अगोदर प्रॅक्टिससाठी गेलो होतो. कायल एबॉट आणि हार्डस विलजोएमन यांच्यापैकी कुणाला खेळवायचं, अशी चर्चा तेव्हा सुरु होती. त्यावेळी रबाडाला वगळलं जावं, असं टीम मॅनेजमेंटने सांगितलं.

तेव्हा त्याला कोणत्या आधारावर बाहेर बसवायचं, असं मी विचारलं. तर त्याच्या हातून योग्य प्रकारे बॉल सुटत नसल्याचं सांगितलं गेलं. त्यावेळी रबाडा २० वर्षांचा होता. एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्यावेळी त्याने आपलं त्यावेळी कमवलं नव्हतं.

हे ही वाचा:

राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?

मुंबईतील ‘या’ रुग्णालयात झाली गॅस गळती

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस

राहुल गांधींचा ‘हा’ प्रयत्न ठरला फोल

आपल्या डेब्यूच्या सहा वर्षांनंतर, रबाडाने स्वत:ला तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण अफ्रिकाचा विकेट टेकर बोलर म्हणून सिद्ध केलं आहे. रबाडाने ४७ टेस्ट, ७९ एकदिवसीय आणि ३२ टी २० इंटरनॅशनलमध्ये अनुक्रमे २१३, १२२ आणि ९६ विकेट घेतल्या आहेत. रबाडाने दक्षिण अफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय करियरमध्ये १००० पेक्षा अधिक रन्स देखील केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा