जगप्रसिद्ध केदारनाथ धामच्या सुरक्षेची जबाबदारी आता आयटीबीपीकडे सोपवण्यात आली आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी आधुनिक शस्त्रास्त्रांसह आयटीबीपीचे ३० जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. हे सैनिक एप्रिलपर्यंत धाममध्ये राहतील. वास्तविक, धाममध्ये बांधकाम सुरू असून त्यासाठी सुमारे ४०० मजूर काम करत आहेत. अलीकडेच मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. यामुळेच धाममध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मंदिर समितीला मंदिराच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी ठेवायची नाही. मंदिर समितीने सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्याची विनंती गृह मंत्रालयाकडे केली होती. मंदिर समितीने पाठवलेल्या पत्राची दखल घेत गृह मंत्रालयाने मंदिराची सुरक्षा सर्वात महत्त्वाची मानली आणि सुरक्षेची जबाबदारी आयटीबीपीकडे सोपवण्यात आली आहे. मंदिराच्या तिन्ही दरवाजांवर ड्युटीसोबतच हे जवान संपूर्ण हिवाळ्यात केदारनाथची सुरक्षा करणार आहेत.
हेही वाचा :
ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामीनदाराचं शिंदे गटात
सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे माफी मागणार काय ?
आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी
मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले की, यावर्षी केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे आणि बद्रीनाथ धामचे गर्भगृह सोन्याने मढवलेले आहे. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी दरवाजे बंद करण्यापूर्वी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. सध्या बद्रीनाथ आणि केदारनाथ धाममध्ये मास्टर प्लॅन अंतर्गत कामे सुरू आहेत. मोठ्या संख्येने मजूर तेथे राहत आहेत आणि सतत हालचाली सुरू आहेत. त्यानंतर येथे आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
गुप्तकाशीचे पोलिस उपअधीक्षक विमल रावत म्हणातात, केदारनाथमध्ये ३० आयटीबीपी जवान तैनात आहेत. या जवानांसोबत पोलीस दलही सक्रीय आहे. केदारनाथ मंदिराची सुरक्षा आता आयटीबीपीच्या जवानांकडे सोपवण्यात आली आहे. हे सैनिक एप्रिल महिन्यापर्यंत येथे तैनात असतील आणि केदारनाथमध्ये असलेले हेलिपॅड नेहमीच सक्रिय असेल.